2021 मध्ये Maruti, Hyundai, Tata च्या गाड्यांचा बोलबाला, Alto पहिल्या स्थानी कायम

मारुती सुझुकी कंपनीचं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 गाड्यांपैकी किमान 4 ते 5 कार मारुतीच्या असतात. मारुतीने बाजारावरील त्यांचं वर्चस्व 2021 मध्येदेखील कायम ठेवलं आहे.

| Updated on: Dec 22, 2021 | 5:15 PM
मारुती सुझुकी कंपनीचं भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 गाड्यांपैकी किमान 5 कार मारुतीच्या असतात. मारुतीने बाजारावरील त्यांचं वर्चस्व 2021 मध्येदेखील कायम ठेवलं आहे. दरम्यान, यंदा बाजारात मारुतीला Hyundai Motor, Tata Motors ने चांगली स्पर्धा दिली.

1 / 10
Maruti Suzuki Alto : गेल्या अनेक वर्षांपासून देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या यादीत Maruti Suzuki Alto वरच्या स्थानावर आहे. या कारचा जलवा यावर्षीदेखील पाहायला मिळाला. ही या वर्षातील सर्वाधिक विक्री झालेली कार आहे. या कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह 796cc चं इंजिन मिळेल. हे इंजिन 6000 आरपीएमवर 47.3bhp पॉवर आणि 3500 आरपीएमवर 69Nm टॉर्क जनरेट करते. कारला प्रति लीटर 22.05 किलोमीटरचे मायलेज मिळते आणि या कराची एक्स-शोरूम किंमत 4 लाख रुपये इतकी आहे.

2 / 10
Maruti Suzuki Dzire : Maruti Suzuki Dzire ही देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कार आहे. कंपनीने नुकतीच ही कार अपडेट केली आहे. ही कार 7.0 इंचांच्या टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह येते, जी ट्रॅक चेंज, व्हॉल्यूम अप / डाऊन, रेडियो आणि मीडिया सेटअपसारख्या बेसिक फीचर्ससह येते. यामध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सपोर्ट देण्यात आला आहे. या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.2-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड के-सिरीज पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 89bhp पॉवर आणि 113Nm पीक टार्क जेनरेट करतं. या इंजिनासह 5 स्पीड मॅनुअल गियरबॉक्स आणि 5 स्पीड AMT गियरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. हे मॉडेल 23.26 kmpl मायलेज देतं. या कारची एक्स शोरुम किंमत 6.92 लाख रुपये इतकी आहे.

3 / 10
Maruti Suzuki Vitara Brezza : मारुती सुझुक विटारा ब्रेझाची (Maruti Suzuki Vitara Brezza) किंमत 7.39 लाख ते 11.20 लाख रुपयांदरम्यान आहे. यात आपल्याला 1.5-लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे 103 bhp पॉवर आणि 138nm टॉर्क जनरेट करते. मारुती विटारा ब्रेझा एकूण 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि या कारचे बेस मॉडेल एलएक्सआय असून टॉप व्हेरिएंट झेडएक्सआय आहे. ही देशातील टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.

4 / 10
Hyundai Creta : देशात मारुतीच्या गाड्यांचा बोलबाला असताना Hyundai ची Creta या वाहनांना बाजारात चांगलीच स्पर्धा देत आहे. ही कार 10 ते 14 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे. यात 1.5-लीटर MPI एस्पिरेटेड पेट्रोल मोटर जे 1,497 cc चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. जे 6,300 rpm वर 113 bhp पॉवर आणि 450 rpm वर 144 Nm पॉवर निर्माण करते. मोटार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि पर्यायी iVT (इंटेलिजेंट व्हेरिएबल ट्रान्समिशन) ऑटोमॅटिक युनिटशी जोडलेली आहे.

5 / 10
Honda City : परवडणारी किंमत, मायलेज आणि फीचर्समुळे होंडा सिटी (Honda City) ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री करणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे. या कारची किंमत 10.99 लाखांपासून सुरू होते आणि 14.94 लाखांमध्ये ही कार खरेदी करता येते. कारच्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये 1498 cc क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. मायलेज 17.8 ते 24.1 च्या दरम्यान आहे. या कारचं इंजिन 97.89 ते 119.35bhp पॉवर जनरेट करतं. मारुती, टाटा आणि ह्युंडईव्यतिरिक्त ही एकमेव कार टॉप सेलिंग वाहनांच्या यादीत आहे.

6 / 10
Hyundai Venue : वेन्यूचं डिझाईन अत्यंत बोल्ड आहे. बाजुने ही क्रेटा सारखी दिसते. पणएसयूव्हीमध्ये केसकेडिंग ग्रिल, स्प्लिट हेडलॅम्प्स, प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स, एलईडी टेललॅम्प्स, 16-इंचांचा डायमंड कट अलॉय व्हिल्ज देण्यात आले आहेत. एसयूव्हीमध्ये प्रीमिअम लेझर कट फिनिश डॅशबोर्ड आणि फॅब्रिक आणि लेदर फिनिश सीट्स देण्यात आली आहेत. यामध्ये स्लाईडिंग फ्रंट आर्म रेस्ट आणि कप होल्डरसोबत रिअर आर्म रेस्ट देण्यात आले आहेत. वेन्यूचा बूट स्पेस 350-लीटरचा आहे. एसयूव्हीमध्ये 10 कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. वेन्यूची सुरुवातीची किंमत 6.50 लाख ते 11.10 लाख रुपयांदरम्यान आहे.

7 / 10
Hyundai Grand i10 Nios : Hyundai Grand i10 Nios मध्ये सीएनजीपासून ते टर्बो, पेट्रोल आणि डिझेलपर्यंत सर्व इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. ही कार मध्यमवर्गीय कुटुंबासाठी परिपूर्ण कार आहे. यात 1.2 लिटर पेट्रोल टँक आणि 1.2 लिटर डिझेल इंजिन मिळेल. हे दोन्ही इंजिन बीएस-6 एमिशन नॉर्म्सनुसार असतील. ही कार 5.19 लाख ते 8.41 लाख रुपयांदरम्यानच्या किंमतीत (एक्स-शोरूम, दिल्ली) ही कार उपलब्ध आहे

8 / 10
Tata Tiago : Tiago मध्ये 1.2-लीटर नॅचरली अॅस्पीरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 85 bhp आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. याच्या XT (O) ट्रिममध्ये, ही मोटर केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे तर XT, XZ आणि XZ+ यासारख्या उच्च ट्रिममध्ये 5-स्पीड एएमटीचा पर्याय देखील आहे. यामध्ये व्हील कॅप्ससह 14 इंचाच्या स्टीलच्या रिम्स, मॅन्युअल एअर कंडिशनर, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजेस्टेबल ORVMs, अ‍ॅडजेस्टेबल स्टीयरिंग, चारही पॉवर विंडोज आणि बरेच काही आहे. सेफ्टीसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीसह एबीएस, रियर पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट आणि बऱ्याच सुरक्षा सुविधांचा समावेश आहे.

9 / 10
Tata Nexon : टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये 120hp पॉवर आणि 170Nm साठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 110hp आणि 260Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे. नेक्सॉनची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 6.99 लाख रुपये इतकी आहे. टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

10 / 10
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.