AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Suzuki :डोळे झाकून खरेदी करा मारूतीच्या या गाड्या, मिळेल दमदार मायलेज

या तिन्ही गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. या गाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार सर्व फिचर्सही पाहायला मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे तिन्ही कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध असेल.

Maruti Suzuki :डोळे झाकून खरेदी करा मारूतीच्या या गाड्या, मिळेल दमदार मायलेज
मारूती सुझूकीImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 15, 2023 | 5:01 PM
Share

मुंबई : भारतात कार खरेदी करणाऱ्या सामान्य माणसाची पहिली पसंती ही मारुती सुझूकीला (Maruti Suzuki Car)  असते. याचे कारण कमी देखभाल, चांगले मायलेज आणि परवडणारी किंमत. यामुळेच भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत मारुतीची वाहने नेहमीच अव्वल स्थानावर राहतात. फेब्रुवारी 2023 मध्येही हा विक्रम नेहमीप्रमाणे कायम ठेवण्यात आला आणि मारुतीच्या गाड्यांनी अव्वल स्थान पटकावले.

तुम्हालाही 5 ते 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये एखादी कार खरेदी करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी 3 सर्वोत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. या तिन्ही गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. या गाड्यांमध्ये आवश्यकतेनुसार सर्व फिचर्सही पाहायला मिळतील. चांगली गोष्ट म्हणजे तिन्ही कारमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध असेल, ज्यामुळे भरपूर मायलेज मिळेल आणि इंधनाचा खर्चही कमी होईल.

मारुती सुझूकी बलेनो

बलेनो हे फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारे मारुती सुझूकीचे मॉडेल आहे. हे गेल्या वर्षी मोठ्या अपडेटसह लॉन्च करण्यात आले होते. मारुती बलेनोची किंमत 7.64 लाख ते 11.35 लाख रुपये आहे. ही कार 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. CNG सह 30 किमी पर्यंत मायलेज मिळते. आधुनिक युगातील अनेक प्रगत वैशिष्ट्येही कारमध्ये पाहायला मिळतील.

मारुती सुझूकी स्विफ्ट

मॉडेल मारुती सुझुकी स्विफ्ट ही कंपनीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या सेगमेंटमधील खरेदीदारांमध्ये ही कार लोकप्रिय आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट हे मारुती सुझुकीने बर्याच काळापासून अपग्रेड न केलेल्या काही मॉडेल्सपैकी एक आहे. मात्र, गेल्या वर्षी ते सीएनजी व्हर्जनसह लॉन्च करण्यात आले होते. स्विफ्टला K सीरीजचे 1.2-लिटर ड्युअल जेट ड्युअल पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 23.20-kmpl आणि AMT गिअरबॉक्सला जोडल्यावर 23.76-kmpl मायलेज देते. तसेच CNG सह कार 30 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

मारुती सुझूकी अल्टो

या यादीतील तिसरे मॉडेल देशातील सर्वात परवडणारी मारुती सुझुकी अल्टो कार आहे. हे कंपनीचे तिसरे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल देखील आहे. मारुती सुझुकी अल्टो अल्टो 800 आणि अल्टो K10 या दोन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. दुसरे मॉडेल मागील वर्षी पूर्णपणे नवीन अवतारात लॉन्च करण्यात आले होते. आता भारतीय बाजारपेठेत याला खूप पसंती दिली जात आहे. प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे मॉडेल सर्वोत्तम पर्याय आहे. सीएनजी सह कार 33 किमी पर्यंत मायलेज देते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.