40 किमीचे मायलेज, मारुती सुझुकीचा बाजारात लवकरच हायब्रीड अवतार!

Maruti Suzuki Fronx | बाजारात विविध कंपन्या अनेक प्रयोग करत आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार विविध मॉडेल्स बाजारात दाखल होत आहे. टाटाने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये झेप घेतली आहे. तर इतर कंपन्या हायब्रीड कारवर जोर देत आहेत. मारुती सुझुकीने सर्वात स्वस्त एसयुव्ही Fronx ही हायब्रीड कार बाजारात आणण्याची तयारी केली आहे.

40 किमीचे मायलेज, मारुती सुझुकीचा बाजारात लवकरच हायब्रीड अवतार!
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 3:09 PM

नवी दिल्ली | 11 February 2024 : पेट्रोल, डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक, फ्लेक्स फ्युएल यासोबतच ग्राहक हायब्रीड कारवर पण फिदा आहेत. अशा कारची पण बरीच मागणी आहे. या कार ICE इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरच्या आधारे धावतात. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना टफ फाईट देत आहे. टाटा कंपनीने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लांब उडी घेतली आहे. इतर कंपन्या हायब्रीड कारवर जोर देत आहेत. मारुती सुझुकीने सर्वात स्वस्त एसयुव्ही Fronx ही हायब्रीड कार बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे.

या कार आणण्याची तयारी

एप्रिल 2020 मध्ये मारुतीने डिझेल कारचे उत्पादन थांबवले. त्यानंतर कंपनीने पेट्रोल आणि CNG पोर्टफोलिओवर लक्ष केंद्रीत केले. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनी पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही Maruti eVX आणण्याच्या तयारीत आहे. यासोबतच मारुती सुझुकी हायब्रिड सेगमेंटमध्ये पण मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.

हे सुद्धा वाचा

हायब्रीड Fronx ची चर्चा

ऑटोकारच्या वृत्तानुसार, मारुती सुझुकी 2025 पर्यंत त्यांची सर्वत स्वस्ती एसयुव्ही Maruti Fronx ची हायब्रीड कार बाजारात उतरवू शकते. मायलेज आणि लो मेंटनेंस बाबतीत मारुती सुझुकी नेहमीच पहिली आली आहे. तर गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सने बाजारातील समीकरणे झटपट फिरवली आहेत. आतापर्यंत डिझेलची जड वाहन तयार करणाऱ्या टाटा समूहाने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मोठी झेप घेतली आहे. तर सीएनजी सेगमेंटमध्ये पण घुसखोरी केली आहे. त्यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

काय आहे हायब्रिड कार

  • मारुती सुझुकीच्या कारमध्ये हायब्रिड सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. हायब्रिड पॉवरट्रेन (HEV) कोडनेम देण्यात आले आहे. ही कार किफायतशीर आणि स्वस्त असेल. हायब्रिड सिस्टिममध्ये पेट्रोल इंजिन केवळ जनरेटर वा रेंज एक्सटेंडर प्रमाणे कार्य करत आहे. या प्रकारचे वाहन थेट चालविण्याऐवजी एका इलेक्ट्रिक मोटरला विद्युत पुरवठा करेल. त्याआधार कार धावेल.
  • ICE इंजिन इलेक्ट्रिक वाहन बॅटरी पॅकला रिचार्ज करण्यासाठी जनरेटरसारखे काम करेल. मारुती सुझुकीच्या HEV आधारीत रेंजमध्ये एकदम नवीन Z12E, तीन सिलेंडर इंजिन असेल. हे इंजिन एखाद्या जनरेटरप्रमाणे काम करेल. ते 1.5 kWh बॅटरी पॅकला चार्ज करेल. या नवीन हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर कंपनी या नवीन Fronx कारमध्ये करेल.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.