Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकी ग्रँड विटारा आज भारतात लाँच होणार, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या….
Maruti Suzuki Grand Vitara Launch Today : मारुती आपली नवीन SUV सेगमेंट कार New Grand Vitara भारतीय लाँच करणार आहे. या नव्या कारच्या किमतीसह फीचर्स देखील जाणून घ्या...
मुंबई : मारुती आपली नवीन SUV सेगमेंट कार ग्रँड विटारा (New Grand Vitara) आज भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. ही कार सौम्य हायब्रीड आणि मजबूत हायब्रिड इंजिनसह येणार आहे. यात 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि पॅनोरामिक सनरूफ मिळेल. नवीन मारुती ग्रँड विटारा मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये उतरणार आहे. ती MG Aster, Tata Harrier आणि Hyundai Creta कारशी स्पर्धा करेल. यात Kia Seltos चे नाव देखील समाविष्ट केले जाऊ शकते. मारुतीने (Maruti) यासंदर्भात अनेक छोटे टीझर जारी केले आहेत.या टीझर्समध्ये या एसयूव्हीचे (SUV) प्रगत आणि हायटेक फीचर्स दाखवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रँड विटारा हायब्रिड इंजिनसह येईल. कंपनीने त्याचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. तुम्ही 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ते बुक करू शकता. CarPrice वेबसाइटनुसार, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असेल. कंपनीने या SUV च्या कोणत्या फीचर्सचा खुलासा केला आहे ते पाहुया…
नव्या कारचा टीझर पाहा
Maruti Suzuki Grand Vitara to get panoramic sunroof – New teaser pic.twitter.com/mqUIZxiM63
हे सुद्धा वाचा— RushLane (@rushlane) July 16, 2022
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची फीचर्स
डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास 2022 मारुती सुझुकी ग्रँड विटारा मध्ये स्लिट हेडलॅम्प डिझाइन, सिंगल स्लेट आणि क्रोम इन्सर्टसह नवीन ग्रिल, बॉडी कलर ORVM, ब्लॅक रूफ, नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील आणि एलईडी टेललाइट्स देखील मिळतील. अलीकडेच टोयोटानं आपली हायब्रीड कार लाँच केली आहे. आता मारुतीनेही तयारी केली आहे. पण हायब्रीड इंजिन प्रणाली म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? हायब्रीड कारमधील इंधन इंजिनचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी केला जातो. कार कंपन्या वापरकर्त्यांच्या गरजेनुसार विविध हायब्रीड डिझाइन्स वापरतात.
विटारामध्ये सनरूफ असेल
2022 मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलतांना यात पॅनोरॅमिक सनरूफ, नऊ इंच फ्री स्टँडिंग टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. तसेच, यात नवीन हेडअप डिस्प्ले मिळेल. कार 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा सेटअपसह देखील येईल, जे पार्किंग आणि कार रिव्हर्स दरम्यान खूप उपयुक्त ठरेल. यामध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिसेल.
ईव्ही आणि ड्राइव्ह मोड
ग्रँड विटाराच्या टीझरवरून हे स्पष्ट होते की या कारला ईव्ही मोड मिळेल. ईव्ही मोडमध्ये, कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते. कारची बॅटरी इलेक्ट्रिक मोटरला ऊर्जा देते आणि इलेक्ट्रिक मोटर चाकांना शक्ती देते. ही प्रक्रिया शांत आहे. त्यात कोणताही आवाज नाही. हायब्रिड मोडमध्ये, कारचे इंजिन इलेक्ट्रिक जनरेटरचे काम करते आणि इलेक्ट्रिक मोटर कारची चाके चालवते.
टायर प्रेशर फीचर
ग्रँड विटाराच्या कोणत्या टायरमध्ये किती हवा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला कारच्या स्क्रीनवर मिळेल. होय, यात टायरचे दाब तपासण्याचे वैशिष्ट्य असेल. टायरमध्ये हवा कमी असल्यास त्याची माहिती आपोआप मिळते.तुम्ही टायर्सची हवा मॅन्युअली तपासण्यास देखील सक्षम असाल.