Brezza: नवीन ब्रेझाचे ‘हे’ फीचर्स लाँच होण्यापूर्वीच झाले लीक, जाणून घ्या काय असणार खास?
नेक्स्ट जनरल मारुती सुझुकी विटारा ब्रेझा फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲप्पल कार प्ले सपोर्ट, हेडसअप डिसप्ले, 360 डिग्री कॅमेरा, ड्युअल टोन डॅशबोर्ड, होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबलिटी कंट्रोलसह अनेक फीचर्समध्ये उपलब्ध आहे.
मारुती सुझुकी या महिन्याच्या अखेरीस म्हणजे 30 जूनपर्यंत आपली पुढची सिरीजची ब्रेझा लाँच करणार आहे, नवीन ब्रेझाचे डिझाईन अतिशय आकर्षक असून यात विविध फीचर्सही देण्यात आले आहे. त्यामुळे या कारच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. लाँच होण्यापूर्वीच नवीन ब्रेझाचे (Brezza 2022) फीचर्स एकामागून एक समोर येऊ लागले आहेत. यासोबतच काही डीलरशिप्सनी आगामी ब्रेझाचे बुकिंगही सुरू केली आहे. 2022 ब्रेझाच्या टॉप व्हेरियंटच्या लीक फीचर्सबद्दल या लेखातून माहिती देणार आहोत. ब्रेझाच्या टॉप व्हेरियंटमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो (Android Auto) आणि ॲप्पल कार प्ले (Apple Car Play) सपोर्टसह फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
काय असतील फीचर्स
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी विटारा ब्रेझामध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड तसेच हेडअप डिसप्ले, 360 डिग्री कॅमेरा, फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील्स, ऑटोमॅटिक एसी, ड्युअल टोन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, न्यू जनरेशन टेलिमॅटिक्स, सनरूफ, रिअर आदी असणार आहे. या शिवाय हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक स्टेबलीटी कंट्रोल आणि एअरबॅग्ज यांसारखी सेफ्टी फीचर्स देखील मिळणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, ग्लोबल NCAP कार क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळविणारी नवीन मारुती ब्रेझा ही कंपनीची पहिली कार असू शकते. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
नवीन इंजिनसह उपलब्ध
नेक्स्ट जनरेशन मारुती सुझुकी विटारा ब्रेझाच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात एक नवीन इंजिन 1.5 लीटर 4 सिलेंडर K15C ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करेल. नवीन ब्रेझा मायलेजच्या बाबतीतही उत्तम असेल. ब्रेझा 2022 5 स्पीड मॅन्युअल तसेच नवीन 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येऊ शकते. लीक झालेल्या इमेजनुसार, ब्रेझाच्या पुढच्या आणि मागील भागात बरेच बदल पाहिले जाऊ शकतात.