पेट्रोल-डिझेलचा जमाना गेला, देशात CNG गाड्यांना वाढती मागणी, ‘या’ कंपनीकडून 1,57,954 कार्सची विक्री

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.

पेट्रोल-डिझेलचा जमाना गेला, देशात CNG गाड्यांना वाढती मागणी, 'या' कंपनीकडून 1,57,954 कार्सची विक्री
Maruti Suzuki S Cng
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 7:02 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळेच भारतात सीएनजी गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Maruti Suzuki sells 157954 CNG vehicles in in FY 2020-21)

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने असे म्हटले आहे की, त्यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात 1.57 लाख अशा वाहनांची विक्री केली आहे, ज्यामध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात आलं आहे. पेट्रोल आणि डिझेल कारला पर्याय म्हणून मारुती सुझुकी कंपनी S-CNG सेगमेंटमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे.

पेट्रोल वाहनात सीएनजी किट जोडल्यास ग्राहक दोन फ्यूल मोडवर वाहन चालवू शकतात. याशिवाय सीएनजीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाहन पर्यावरणास अनुकूल आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत या कारवर कमी खर्च होतो.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या मार्केटिंग सेल्स विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले की, देशातील जास्तीत जास्त शहरांमध्ये सीएनजी फिलिंग स्टेशन स्थापित केले जात आहेत. दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होत आहे. त्यामुळेच देशात सीएनजी वाहने लोकप्रिय होऊ लागली आहेत. तसेच सीएनजी वाहनांच्या विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी सर्वात पुढे आहे.

श्रीवास्तव म्हणाले की, सरकार देशभरात सीएनजी आउटलेट्सची संख्या वाढवण्याचे काम करीत आहे. आम्हाला विश्वास आहे की, या आव्हानात्मक काळातही फॅक्टरी फिटेड सीएनजी वाहने खरेदी करण्याची मागणी वाढेल.

Tata Moros फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देणार

टाटा मोटर्सच्या काही मॉडेल्समध्ये फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात येणार आहे. सध्या, टाटा मोटर्स कंपनी आपल्या काही पीव्हीमध्ये (Passenger Vehicle) डीलरशिपवर सीएनजी किट मिळवण्याचा पर्याय देते. बाजारात सीएनजी वाहनांची आवक वाढणे आवश्यक झाले आहे, कारण अलीकडेच पेट्रोलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी एका मुलाखतीत सांगितले की चालू आर्थिक वर्षात काही मॉडेल्सचे फॅक्टरी फिटेड सीएनजी पर्याय सादर केले जातील.

इतर बातम्या

खुशखबर! Mahindra कडून Scorpio वर बंपर डिस्काऊंट

Renault कडून SUV सह अनेक गाड्यांवर 750000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

Nissan Magnite की Renault Kiger, विक्रीच्या बाबतीत कोणती कार अव्वल?

(Maruti Suzuki sells 157954 CNG vehicles in in FY 2020-21)
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.