Maruti Jimny च्या इंडिया लाँचिंगला कंपनीचा ग्रीन सिग्नल, जाणून घ्या कशी आहे नवीन SUV?
ऑटो एक्सपो 2020 मध्ये मारुती जिम्नी (Maruti Jimny) सादर करण्यात आली होती. तेव्हापासून ही कार भारतात कधी लाँच होणार, असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे.
मुंबई : ऑटो एक्सपो 2020 मध्ये मारुती जिम्नी (Maruti Jimny) सादर करण्यात आली होती. तेव्हापासून ही कार भारतात कधी लाँच होणार, असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. तसेच या कारच्या लाँचिंग डेटबाबत अनेकदा वेगवेगळ्या अफवा समोर आल्या आहेत. तसेच त्याबाबत अनेकदा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार मारुती सुझुकीने जिम्नीला भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. नुकत्याच झालेल्या एका डीलर इव्हेंटमध्ये कंपनीने ही माहिती शेअर केली. मात्र जिम्नी लाँच करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. (Maruti Suzuki to launch 5-door Jimny SUV in India, know price and features)
भारतात महिंद्राने आपली न्यू जनरेशन थार एसयूव्ही आधीच लॉन्च केली आहे. न्यू जनरेशन गुरखादेखील नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. मारुतीची आगामी जिमनी एसयूव्ही दोन्ही ऑफ-रोडर्सना थेट स्पर्धा देईल. मारुती सुझुकी जिम्नीची नवीन इंडिया-स्पेक 5-डोर LWB आवृत्ती 2022 मध्ये देशात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.
दमदार इंजिन
इंटरनॅशनल-स्पेक जिम्नी 1.4 लीटर माइल्ड-हायब्रिड टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह येते, तथापि, भारतासाठी, 1.5 लीटर K15B पेट्रोल इंजिन यात वापरले जाऊ शकते. हेच इंजिन मारुतीच्या विद्यमान Vitara Brezza, Ciaz, Ertiga आणि XL6 कारमध्येही उपलब्ध आहे. हे इंजिन 6000rpm वर 103bhp मॅक्सिमम पॉवर तसेच 4400rpm वर 138Nm पीक टॉर्क निर्माण करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येईल आणि पर्यायी 4 स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशन देखील देऊ शकेल.
कशी आहे मारुती जिम्नी?
मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत जिम्नीचे 5-डोर व्हेरिएंट लॉन्च करणार असल्याची पुष्टी झाली आहे. लांब व्हीलबेस असलेल्या जिम्नीचे स्पाय शॉट्स आधीच इंटरनेटवर लीक झाले आहेत. त्यामुळे सुझुकी जिम्नीचे मोठे प्रकार व्हेरिएंट करत आहे. जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी 3,850 मिमी, रुंदी 1,645 मिमी आणि उंची 1,730 इतकी मिमी असेल. या एसयूव्हीचा व्हीलबेस 2,550mm असेल. तर, लांबी आणि व्हीलबेस 300 मिमीने वाढेल. व्हीलबेस विटारा ब्रेझापेक्षा थोडा लांब आहे.
इतर बातम्या
ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी
2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत
सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर
(Maruti Suzuki to launch 5-door Jimny SUV in India, know price and features)