Maruti XL6 2022 या आठवड्यात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या स्पोर्टी लूक असलेल्या कारची किंमत आणि फीचर्स

गुरूवारी भारतात लाँच होत असलेल्या Maruti XL 6 2022 कारबाबत वाहनचालकांमध्ये उत्सुकता आहे. ऑल-न्यू XL6 मारुती XI6 2022 ला स्लीक हेडलॅम्प मिळतील. स्पोर्टी लुक असणाऱ्या या कारमध्ये 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि हेडअप डिस्प्ले मिळेल.

Maruti XL6 2022 या आठवड्यात लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या स्पोर्टी लूक असलेल्या कारची किंमत आणि फीचर्स
Maruti XL6 2022 Image Credit source: Maruti Suzuki
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 12:30 PM

मुंबई : मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) 21 एप्रिल रोजी भारतात मारुती एक्सएल 6 (Maruti XL6 2022) ही कार लाँच करणार आहे. ही कार अनेक चांगल्या फीचर्ससह, नवीन हेडलाइट्स आणि नवीन इंटीरियरसह ऑफर केली जाईल. ही एक एमपीव्ही कार (MPV Car) आहे आणि ती प्रीमियम फीचर्ससह लॉन्चिंगसाठी सज्ज आहे. Maruti XL 6 2022 ही सहा सीटर कार आहे, तर ज्यांना 7 सीटर पर्याय हवा असेल ते ग्राहक अर्टिगा हा पर्याय निवडू शकतात. जी कंपनीने गेल्या आठवड्यात लाँच केली आहे. नवीन मारुती XL6 लाँचिंगनंतर रस्त्यांवर धावताना दिसेल. ही कार Kia Carens आणि इतर थ्री रो कारशी स्पर्धा करेल. मारुती XL6 मध्ये नवीन इंजिन, नवीन सेट गिअरबॉक्स आणि अनेक बदल पाहायला मिळतील. स्पोर्टी लुक मध्ये असणाऱ्या या कारमध्ये, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि हेड अप डिस्प्ले मिळेल. याशिवाय, यात ऑल न्यू 7-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

2022 मारुती XL6 फेसलिफ्टच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यात अनेक एक्सटीरियर अपडेट्स आणि इंटर्नल अपडेट्स पाहायला मिळतील. कार निर्मात्याने शेअर केलेल्या टीझरनुसार, XL6 स्पोर्टी लुकमध्ये असेल. यासोबतच यात क्रोम स्ट्रीक आणि क्रोम ग्रिल पाहायला मिळणार आहे. ड्युअल टोन अलॉय व्हील्स देखील असतील, जे कदाचित 16-इंच चाकांसह ठोठावतील. या अलॉय व्हील्सवर पूर्णपणे वेगळी रचना पाहायला मिळणार आहे.

2022 मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट वैशिष्ट्ये

2022 मारुती सुझुकी XL6 फेसलिफ्ट वैशिष्ट्ये 2022 मारुती XL6 फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन मारुती सुझुकी बलेनो 2022 प्रमाणेच विशेष वैशिष्ट्ये मिळतील. मारुती XL6 2022 मधील मॉडेलमध्ये 360-व्ह्यू कॅमेरा आणि हेड-अप डिस्प्ले मिळेल. यासोबतच यात सर्व नवीन 7 इंच टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे, जी नवीन एर्टिगा मध्ये देखील दिसली आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि कारप्लेला सपोर्ट करते. मारुतीच्या या आगामी कारमध्ये वायरलेस चार्जिंगची वैशिष्ट्ये देखील उपलब्ध होणार आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्तम

सुरक्षिततेच्या दृष्टीने मारुतीच्या या आगामी कारमध्ये, चार नवीन एअरबॅग्स उपलब्ध असतील. जे एक मानक आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्ज उपलब्ध असतील. दुसऱ्या पिढीतील मारुती XL6 ला 1.5-लीटर K15 मालिका ड्युअल जेट पेट्रोल इंजिन मिळेल. याशिवाय यात 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स दिसेल. एकूणच, आगामी मारुती XL6 2022 ला जुन्या आवृत्तीपेक्षा अधिक प्रीमियम अनुभव मिळेल. कंपनीने अद्याप किंमतीबाबत माहिती शेअर केलेली नाही. सध्याची मारुती XL6 ची सुरुवातीची किंमत एक्स शोरूम किंमत 10.14 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 12.02 लाख रुपये आहे.

इतर बातम्या

वाहन प्रवास सुकर होणार! रस्त्यांवरील टोल आणि टॅक्सची माहिती Google Maps वर

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

3 लाखांहून कमी किंमतीत सेकेंड हँड कार, जाणून घ्या कुठे मिळतायत शानदार ऑफर्स

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.