AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Car : ‘मारुती’ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच करणार एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

मारुतीची वायवाय 8 ला 2 व्हील्स ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्ररायविंकसह उपलब्ध करण्यात येणार आहे. या सोबतच याचा 2700  एमएमचा व्हीलबेस देखील मिळू शकतो. दरम्यान, 2 व्हील ड्रायव्हींगचा पर्याय केवळ घरगुती बाजारातच उपलब्ध असणार आहे.

Electric Car : 'मारुती'ची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच करणार एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...
इलेक्ट्रिक कारImage Credit source: social
Updated on: Jun 26, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : भारतीय ऑटोमोबाईल (Indian Automobile) बाजाराबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक कार (Electric Car) सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल व विस्तार होत गेला आहे. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स नेहमीच अव्वल राहिली आहे. दुसरीकडे आईसीई इंजिन सेगमेंटमध्ये मारुती देखील आता टॉपवर पोहचली आहे. यात अनेकांना आता असा प्रश्‍न पडलाय, की मारुती सुझुकी आपली इलेक्ट्रिक कार कधी लाँच करणार आहे. मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) अनेक एसयुव्ही कार लाइनअपमध्ये आहेत. त्यांना लवकरच भारतीय बाजारात आणण्यात येणार आहे. यात न्यू जेनरेशन ब्रेझा कारचाही सहभाग असणार आहे. यानंतर कंपनी ऑल न्यू मिडसाइज एसयुव्ही कार विटारालाही बाजारात आणणार आहे. 5 सीटर कारबद्दल बोलायचे झाल्यास मारुती टोयोटासोबत मिळून मारुती एक न्यू एसयुव्ही कार तयार करीत असून त्यात अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.

टोयोटाच्या मदतीने कामाला सुरुवात

मारुती सुझुकी आपली पहिली ऑल इलेक्ट्रिक एसयुव्ही कारला बाजारात आणण्यासाठी टोयोटासोबत काम करीत आहे. अद्याप या अपकमिंग कारचे नाव समोर आलेले नाही. परंतु या कारचा कोडनेम समोर आलेला आहे. मारुतीच्या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचा कोडनेम वायवाय 8 असणार आहे. याची बॉडी स्टाइल मारुती सुझुकी विटारा सारखी असणार आहे. एका माहितीनुसार, या कारचा डायमेंशन ह्युंडाई क्रेटा कारपेक्षाही जास्त असू शकतो.

गाडीवाडी नावाच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, मारुतीची अपकमिंग इलेक्ट्रिक कारची स्पर्धा एमजी जेडएस ईव्हीशी होणार असून याच्या साइजमध्येही बरेच साम्य असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे मारुतीची अपकमिंग इलेक्ट्रिककारची किंमत टाटा नेक्सॉनच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

2 व्हील्स आणि ऑल व्हील ड्रायव्हिंगचा पर्याय

मारुतीची वायवाय 8 ला 2 व्हील्स ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्ररायविंकसह उपलब्ध करण्यात येणार आहे. या सोबतच याचा 2700  एमएमचा व्हीलबेस देखील मिळू शकतो. दरम्यान, 2 व्हील ड्रायव्हींगचा पर्याय केवळ घरगुती बाजारातच उपलब्ध असणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या आधारे, या लेटेस्ट इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर्स लावण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून 138 एचपीची पावर जनरेट होण्यास मदत होते. या मोटरला पॉवर देण्यासाठी 48 किलोवॅट लीओन बॅटरी लावण्यात आली आहे. लिक झालेल्या माहितीनुसार, ही एक सिंग चार्जमध्ये 4000 किमीपर्यंची रेंज मिळवण्यास सक्षम आहे.

माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा.
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.