MG Motor ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 500+ Astor SUV ची डिलीव्हरी

MG मोटर इंडियाने मंगळवारी जाहीर केले की, त्यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात ग्राहकांना नवीन लाँच केलेल्या Astor मिड-साइज SUV चे 500 पेक्षा जास्त युनिट्स वितरित केले आहेत.

MG Motor ची रेकॉर्डब्रेक कामगिरी, धनत्रयोदशीच्या दिवशी तब्बल 500+ Astor SUV ची डिलीव्हरी
MG Astor
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 6:06 PM

मुंबई : MG मोटर इंडियाने मंगळवारी जाहीर केले की, त्यांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर एका दिवसात ग्राहकांना नवीन लाँच केलेल्या Astor मिड-साइज SUV चे 500 पेक्षा जास्त युनिट्स वितरित केले आहेत. जागतिक स्तरावर सेमीकंडक्टरची कमतरता असूनही, 500 MG Astor SUV ची पहिली बॅच ग्राहकांना देण्यात आली. (MG Astor Deliveries started In India; Over 500 Units Delivered On Dhanteras)

ब्रिटीश ऑटोमेकर या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना 5,000 Astor एसयूव्ही वितरीत करण्याचे प्रारंभिक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सेमीकंडक्टर चिपची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. 21 ऑक्टोबर रोजी बुकिंग विंडो उघडल्यापासून या वर्षासाठी बुक केलेल्या सर्व 5,000 युनिट्सचे बुकिंग 20 मिनिटांपेक्षा कमी वेळेत झाले.

कशी आहे MG Astor SUV?

MG Astor SUV कंपनीच्या सध्याच्या MG ZS EV ची ही पेट्रोल आवृत्ती आहे. पण कंपनीने त्यात अशी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत ज्यामुळे ती देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) वाली कार ठरते. MG Astor मध्ये, कंपनीने पर्सनल AI असिस्टंट दिलं आहे. या कारच्या पर्सनल AI असिस्टंटला पॅरालिम्पिक खेळाडू आणि खेलरत्न दीपा मलिक यांनी आवाज दिला आहे. एसयूव्ही विभागातील ही देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलीजन्स (AI) कार असल्याचा कंपनीचा दावा आहे.

MG Astor दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल, ज्यात 1.5 लीटर NA पेट्रोल मोटर (110 PS / 144 Nm) आणि 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल मोटर (140 PS / 220 Nm) यांचा समावेश असेल. पहिल्या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन किंवा 8 स्टेप सीव्हीटी असू शकते, तर नंतरचे 6 स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. Astor 1.5L MT एकूण 6 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्टाईल, सुपर, स्मार्ट एसटीडी, स्मार्ट, शार्प एसटीडी आणि शार्प ट्रिम लेव्हल्सचा समावेश असेल.

फीचर्स

ग्राहकांना तीन इंटीरियर थीममधून आवडती थीम निवडता येईल. त्यापैकी एक म्हणजे ड्युअल-टोन संगरिया रेड. MG Astor मध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यामध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. इतर स्टँडर्ड फीचर्समध्ये JioSaavn अॅप, आणि MapMyIndia द्वारे मॅप्स आणि नेव्हिगेशन सेवा समाविष्ट आहेत.

एमजी मोटर इंडिया Astor ला हवेशीर फ्रंट सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल सारख्या सुविधांनी सुसज्ज करण्याची अपेक्षा आहे. एमजी मोटर इंडिया त्याच्या कारमध्ये इंडस्ट्रीमधील पहिला पर्सनल असिस्टंट ऑफर करत आहे जे अमेरिकन फर्म स्टार डिझाईनने बनवले आहे. या विभागात पहिली ऑटोनॉमस लेव्हल 2 टेक्नोलॉजी दिली जात आहे.

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये कांटे की टक्कर

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंट भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात सर्वात स्पर्धात्मक आहे. क्रेटा ते सेल्टॉस आणि कुशक पर्यंत, येथे प्रत्येक वाहनाचा स्वतःचा एक यूएसपी आहे. अशा परिस्थितीत, एमजी मोटर इंडिया अॅस्टरला अद्वितीय वैशिष्ट्यांसह पॉवर-पॅक पर्याय म्हणून सादर करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(MG Astor Deliveries started In India; Over 500 Units Delivered On Dhanteras)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.