MG Astor ची 2022 साठी बुकिंग सुरू, जाणून घ्या कंपनी या वर्षासाठी का घेत नाही बुकिंग

कंपनीने MG Hector, Hector Plus आणि ZS EV आणि Gloster नंतर MG Astor लाँच केली आहे. हे एमजी मोटर इंडियाचे पाच नंबरचे मॉडेल आहे. या SUV कारची किंमत 9.78 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

MG Astor ची 2022 साठी बुकिंग सुरू, जाणून घ्या कंपनी या वर्षासाठी का घेत नाही बुकिंग
MG Astor ची 2022 साठी बुकिंग सुरू
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 9:12 PM

नवी दिल्ली : एमजी मोटर इंडियाच्या एमजी एस्टर या अत्याधुनिक एसयूव्ही कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताची पहिली AI सक्षम कार म्हणून आपली ओळख निर्माण करत, 21 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू झाली आणि काही मिनिटांतच कार विकली गेली. आता कंपनीने 2022 साठी प्रायोरिटी बुकिंग सुरु केले आहे. ब्रिटीश कार उत्पादक एमजीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही कार खरेदी करू इच्छिणारे ग्राहक ऑटोमेकरच्या अधिकृत वेबसाइटद्वारे किंवा कोणत्याही अधिकृत डीलरशिपला भेट देऊन 2022 साठी एस्टर एसयूव्ही बुक करू शकतात. MG Astor सादर करताना, कंपनीने दावा केला की 2021 मध्ये Astor SUV चे 5,000 युनिट्स वितरित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि त्यांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. आता पुढील वर्षासाठी बुकिंग सुरू झाले आहे. (MG Astor starts booking for 2022, know why the company is not taking bookings for this year)

कंपनीने MG Hector, Hector Plus आणि ZS EV आणि Gloster नंतर MG Astor लाँच केली आहे. हे एमजी मोटर इंडियाचे पाच नंबरचे मॉडेल आहे. या SUV कारची किंमत 9.78 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने या महिन्यात आपली नवीनतम SUV कार Aster लाँच केली आहे. भारतातील MG Astor ला मिळालेल्या उदंड प्रतिसादावर भाष्य करताना, MG Motor India चे अध्यक्ष आणि MD राजीव छाबा म्हणाले की, ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने ऑटोमेकर खूप उत्साहित आहे. इंडस्ट्री ज्या जागतिक चिप संकटातून जात आहे, ते पाहता आम्ही या वर्षी मर्यादित संख्येतच कार पुरवू शकतो. पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपासून पुरवठा अधिक चांगला होईल अशी आमची अपेक्षा आहे.

MG Astor या गाड्यांना देईल टक्कर

MG Astor SUV ची स्पर्धा Kia Seltos, Hyundai Creta, Volkswagen Taigun आणि Skoda Kushaq यांच्याशी होईल. ही एमजी कार स्टाईल, सुपर, स्मार्ट आणि शार्प अशा चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येते. ही कार प्रगत चालक सहाय्यक प्रणालीसह येते.

MG Astor ची प्रमुख वैशिष्ट्ये

एमजी एस्टर ही वैशिष्ट्यपूर्ण एसयूव्ही कार आहे. ब्रिटीश कार निर्मात्याचा दावा आहे की या कारमध्ये क्लास लीडिंग फीचर्स उपलब्ध आहेत. यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे. ही भारतातील पहिली AI सक्षम कार असल्याचे एमजीचे म्हणणे आहे.

MG Astor इंजिन आणि ट्रान्समिशन

MG Astor SUV दोन इंजिन प्रकारांमध्ये येते, त्यापैकी 1.5 लिटर, चार सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि सीव्हीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे इंजिन 110 PS पॉवर आणि 144 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या कारमधील इंजिनचे दुसरे रूप 1.3L, तीन-सिलेंडर, टर्बो पेट्रोल मोटर्स आणि 6-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्स आहे. हे इंजिन 140 PS आणि 220 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. (MG Astor starts booking for 2022, know why the company is not taking bookings for this year)

इतर बातम्या

Astro remedy for prosperity : सुख आणि समृद्धीसाठी खूप प्रभावी आहेत हे ज्योतिषीय उपाय

BPCL च्या खासगीकरणात अडथळा, बोली लावणाऱ्या कंपन्यांना सहयोगीच मिळत नाहीत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.