MG मोटर इंडियाची 7 सीटर Gloster बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) आज ग्लॉस्टर सॅव्हीची 7-सीटर आवृत्ती सादर केली आहे. ही एसयूव्ही प्रीमियम एसयूव्हीच्या भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल 1) श्रेणीमध्ये भर घालेल.

MG मोटर इंडियाची 7 सीटर Gloster बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
MG Gloster
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 7:09 AM

मुंबई : एमजी मोटर इंडियाने (MG Motor India) ग्लॉस्टर सॅव्हीची 7-सीटर आवृत्ती सादर केली आहे. ही एसयूव्ही प्रीमियम एसयूव्हीच्या भारतातील पहिल्या ऑटोनॉमस (लेव्हल 1) श्रेणीमध्ये भर घालेल. नवीन एमजी ग्लॉस्टर सॅव्ही ट्रिमची नवीन आवृत्ती ग्लॉस्टर रेंज मजबूत करेल आणि ग्राहकांना एमजीच्या टॉप-एंड एसयूव्हीच्या विस्तृत श्रेणीत अधिक पर्याय निवडण्याची संधी देईल. (MG Motor India launches Gloster 7 seater variant with ADAS and intelligent 4×4, check price and features)

37.28 लाख रुपये (एक्स-शोरूम नवी दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीसह, नवीन ग्लॉस्टर सॅव्ही 7-सीटर (2+3+2) कॉन्फिगरेशनमध्ये येते. यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (एडीएएस) आणि बोर्गवार्नर ट्रान्सफर केससह अनेक ड्रायव्हिंग मोड्स मिळतात, जे त्याच्या ऑफ-रोडिंग क्षमतांमध्ये भर घालतात. यात i-SMART टेक्नॉलॉजी, 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, पॅनारोमिक सनरूफ, ड्रायव्हर सीट मसाजर आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

लाँचिंगच्या वेळी, एमजी मोटर इंडियाचे मुख्य व्यावसायिक अधिकारी गौरव गुप्ता म्हणाले की, “ग्राहकांनी विनंती केलेलं 7-सीटर कॉन्फिगरेशन लक्षात घेऊन आम्ही 7-सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लॉस्टर सॅव्ही ऑफर करत आहोत. 6-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये विद्यमान ग्लॉस्टर सॅव्हीसह नवीन आवृत्ती सादर करून, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि आवडीनुसार वाहन निवडण्याचा पर्याय देत आहोत.

7-सीटर एमजी ग्लॉस्टर सॅव्ही 2.0 ट्विन टर्बो डिझेल इंजिनसह सुसज्ज आहे, जे इंजिन 6-सीट ग्लॉस्टर सॅव्हीसारखे आहे जे 200 पीएस पॉवर आणि 480 एनएम पीक टॉर्क तयार करतं.

प्रीमियम एसयूव्ही युनिक, इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच एमवाय एमजी शील्ड ओनरशिप पॅकेजसह येते, ज्याने ग्राहकांच्या विक्रीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासह कार मालकीचा अनुभव पूर्णपणे बदलला आहे. ग्राहकांना 200+ पर्यायांमधून अतिरिक्त सेवा आणि देखभाल पॅकेजेस कस्टमाइज करण्याचा पर्याय देण्याबरोबरच, MY MG Shield च्या स्टँडर्ड 3-3-3 पॅकेजमध्ये तीन वर्ष/100,000 किमी वॉरंटी, तीन वर्षांसाठी रोडसाइड असिस्टन्स आणि तीन लेबर-फ्री पीरियोडिक सरव्हिसेसचा यात समावेश आहे.

इतर बातम्या

जीप 2023 मध्ये आणणार आपली पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV, जाणून घ्या यात काय असेल खास

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

(MG Motor India launches Gloster 7 seater variant with ADAS and intelligent 4×4, check price and features)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.