एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास (MG Motor India's new SUV car will launch in market soon)

एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात, जाणून घ्या या कारमध्ये काय आहे खास?
एमजी मोटर इंडियाची नवी एसयुव्ही कार लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 12:49 PM

नवी दिल्ली : मॉरिस गॅराजेस इंडिया (MG Motor India) यावर्षी भारतात नविन कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार एमजी हेक्टर अंतर्गत भारतातील सर्वात कमी किंमतीतील एसयुव्ही कार असेल. एमजी मोटर इंडिया ही चीनी ऑटोमोटिव्ह निर्माता एसएआयसी मोटरची भारतीय सहाय्यक कंपनी आहे. या उपकंपनीची स्थापना सन 2017 मध्ये करण्यात आली होती आणि 2019 मध्ये कंपनीने विक्री आणि उत्पादन कार्य सुरू केले. कंपनी अनेक दमदार एसयुव्ही कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. (MG Motor India’s new SUV car will launch in market soon)

काय म्हणाले चीफ कमर्शिअल

हेक्टरची नवीन व्हेरिएबल ट्रान्समिशन किंवा सीव्हीटी स्वयंचलित आवृत्ती लॉन्चबाबत बोलताना एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, कंपनी या वर्षाअंती नवीन एसयुव्ही लाँच करेल. कंपनीचे हेड राजीव चाबा यांनी 2021 मध्ये नवीन एसुव्ही कार लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे एप्रिल 2020 मध्ये म्हटले होते. एमजी हेक्टर अंतर्गत ही एसयुव्ही लाँच करण्यात येईल. ही एक एन्ट्री लेवल सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही असून या कारची किंमत 10 लाख रुपयांहून कमी असेल.

पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध

नवी एसयुव्हीबाबत अधिक माहिती देण्यात आली नाही आहे. मात्र ही कार ICE (Internal Combustion Engine) असण्याची शक्यता आहे. कंपनी Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon आणि Mahindra TUV300 आदि गाड्यांनी कडवी टक्कर देण्यासाठी नवी एसयुव्ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध करेल. तथापि, कारबाबत अद्याप चित्र स्पष्ट नाही. सध्या उपलब्ध माहितीनुसार मॉरिस गॅराजेस इंडिया तीन मॉडल पेश करणार आहे. यात एमजी हेक्टर एसयुव्ही, ऑल-इलेक्ट्रिक जेडएस ईवी आणि प्रीमियम, फुल साईज एसयुव्ही एमजी ग्लस्टर या मॉडेलचा समावेश आहे. असे म्हटले जातेय की, कंपनी 2021 मध्ये दोन कार, नवी एन्ट्री-लेवल कॉम्पॅक्ट SUV आणि ICE- पावर्ड ZS पेट्रोल SUV मार्केटमध्ये आणू शकते.

काय खास आहे एमजी हेक्टरमध्ये

एमजी हेक्टरच्या सीव्हीटी व्हेरिएंट्स 16.51 लाख रुपये आणि 18.09 लाख रुपये किंमतीत उपलब्ध आहेत. यात स्मार्ट आणि शार्प ट्रिम्स मिळतील. 6-सीटर हेक्टर प्लसमध्ये नवीन सीव्हीटी गिअरबॉक्स मिळेल. हेक्टर प्लसचे दोन सीव्हीटी ट्रिम पर्याय 17.21 लाख ते 18.89 लाख रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. भारतात या गाडीमध्ये ऑटोमेकर कंपनीने झेडएस ईव्ही, ग्लॉस्टर आणि हेक्टर प्लस सारखे प्रोडक्ट्स जोडले आहेत. हेक्टर डोमेस्कि मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. या गाडीला इंटरनेट इनेबल्ड कार म्हटले जाते. कंपनीने 2021 मधील व्हर्जनमध्ये बरेच बदल केले असून यामुळे हेक्टरला वेगळा लूक आला आहे. (MG Motor India’s new SUV car will launch in market soon)

इतर बातम्या

ना रोटेशनल शिफ्ट, ना टार्गेटचं टेन्शन! घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, व्हाल लखपती

Tiktok चा मेड इन इंडिया नारा, बाईटडान्स कंपनी भारतीय प्रतिस्पर्ध्यालाच अ‍ॅप विकणार?

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.