अवघ्या 50 मिनिटात चार्ज होणारी MG Motors ची शानदार कार 8 फेब्रुवारीला लाँच होणार

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.

अवघ्या 50 मिनिटात चार्ज होणारी MG Motors ची शानदार कार 8 फेब्रुवारीला लाँच होणार
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 10:48 PM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. दरम्यान, प्रसिद्ध कार निर्माती कंपनी MG Motors भारतात नवी इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. (MG Motors MG ZS EV Launching in India)

MG Motor ने त्यांची नवीन अपग्रेडेड मिड साईज एसयूवी MG ZS EV भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने काल (5 फेब्रुवारी) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीने म्हटलं आहे. की अपग्रेडेड MG ZS EV भारतीय बाजारात 8 फेब्रुवारी रोजी लाँच केली जाणार आहे. कंपनीने नवीन MG ZS EV या कारबात सध्या कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु असं म्हटलं जातंय की, MG ZS EV च्या नवीन वर्जनमध्ये कारच्या इंटीरियर आणि इक्स्टीरीअर फीचर्समध्ये बदल केला जाऊ शकतो. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 340 किलोमीटरपर्यंत धावेल.

भारतात किंमत कमी असणार

MG Motor ने यापूर्वी भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक एसयूवी MG ZS लाँच केली होती. या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले होते की, या कारमध्ये बसविलेली बॅटरी भारतात तयार केली जाईल जेणेकरून कारची किंमत कमी ठेवता येईल. त्यामुळे असं म्हटलं जातंय की भारतीय मार्केटमध्ये या कारची किंमत कमी असेल.

‘हे’ फीचर्स असणार

नवीन 2021 MG ZS इलेक्ट्रिक कारमध्ये इमरजन्सी ब्रेकिंग सिस्टिम दिली जाऊ शकते. हे फीचर यापूर्वी MG च्या ग्लॉस्टर या एसयूव्हीमध्ये पाहायला मिळालं होतं. या SUV मध्ये ADAS (अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम) ही सिस्टिम दिली जाऊ शकते. ज्यामध्ये ब्लाईंड स्पॉट मॉनिटरिंग आणि अडॅप्टिव्ह क्रुझ कंट्रोलसारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. असं म्हटलं जातंय की, ZS EV मध्ये मोठा बॅटरी बॅकअप असेल, त्यामुळे सिंगल चार्जवर ही कार 400km हून अधिकची रेंज देऊ शकेल. दरम्यान, असा दावा केला जातोय की, ही कार अवघ्या 50 मिनिटात चार्ज होऊ शकते.

सध्याच्या MG ZS EV मधील फीचर्स

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

(MG Motors MG ZS EV Launching in India)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.