AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुप्रतीक्षित Mercedes-Benz S-Class लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या सेडानमध्ये काय असेल खास?

Mercedes-Benz आणि Hyundai सारख्या कंपन्या या आठवड्यात त्यांच्या नवीन कार भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. Mercedes-Benz कंपनी S-Class ही सेडान लाँच करणार आहे.

बहुप्रतीक्षित Mercedes-Benz S-Class लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या नव्या सेडानमध्ये काय असेल खास?
Mercedes-Benz S-Class
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 4:43 PM

मुंबई : कोरोना साथीच्या रोगामुळे आणि लॉकडाऊनमुळे कार विक्रीच्या बाबतीत एप्रिल आणि मे महिना चांगला ठरला नाही. परंतु लॉकडाऊनचे नियम शिथील होत असताना कार निर्मात्या कंपन्यांनी नवीन गाड्या लाँच करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात काही दमदार गाड्या लाँच करण्यात आल्यानंतर या आठवड्यात Mercedes-Benz आणि Hyundai सारख्या कंपन्या त्यांच्या नवीन कार भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. (much awaited Mercedes-Benz S-Class ready to launch, what will be special in luxurious sedan)

Mercedes-Benz कंपनी लक्झरी सेडान S-Class लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार गेल्या वर्षी जागतिक बाजारात लाँच करण्यात आली होती. आतापर्यंत ज्या-ज्या देशांमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. तिथे या कारला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच कारला चांगले रिव्ह्यूदेखील मिळाले आहेत. ही लक्झरी सेडान भारतात 400d आणि S 450 अशा दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. या कारमध्ये दमदार परफॉरमन्स आणि सुविधा मिळतील.

S-class मध्ये 12.8 इंचांची टॅबलेट स्टाईल OLED इन्फोटेन्मेंट स्क्रीन आणि चालकासाठी 12.3 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले मिळेल, जो अॅक्टिव एम्बिएंट लायटिंग सिस्टममध्ये अधिक आकर्षित दिसेल. यामध्ये 263 LED देण्यात आले आहेत. यामध्ये ऑग्यूमेंटेड रिएलिटीसह हेड-अप डिस्प्ले आणि इंटीरियर असिस्ट फंक्शनदेखील उपलब्ध आहे.

या कारच्या डायमेंशनबाबत बोलायचे झाल्यास भारतात ही कार लाँग व्हीलबेससह लाँच केली जाईल. याची लांबी 34mm आणि रुंदी 22mm इतकी असेल. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, कंपनी ही कार या आठवड्यात गुरुवारी (17 जून) लाँच करणार आहे.

Mercedes-Benz च्या दोन नव्या SUV बाजारात

भारतातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) गेल्या महिन्यात GLA आणि AMG GLA 35 4M या दोन नवीन गाड्या संपूर्ण भारतात उपलब्ध केल्या आहेत. GLA ही एसयूव्ही एप्रिलमध्ये बाजारात दाखल केली जाणार होती. परंतु देशातील कोव्हिड-19 ची परिस्थिती पाहता कंपनीने हे काम पुढे ढकललं. आता मे महिन्याच्या शेवटी या गाड्या बाजारपेठेत दाखल करण्यात येत आहेत. ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, व्यवसाय निरंतरतेला बळ देण्यासाठी आणि रिटेल नेटवर्कच्या आर्थिक स्थिरतेसाठी कंपनीने आपल्या या दोन नव्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या एसयूव्हींच्या किंमती (सर्व किमती एक्स-शोरूम भारत)

  • GLA 200 – 42.10 लाख रुपये)
  • GLA 2020D – 43.7 लाख रुपये
  • GLA 2020D 4M – 46.7 लाख रुपये
  • AMG GLA 35 4M – 57.3 लाख रुपये

या इंट्रोडक्टरी किंमत 30 जून 2021 पर्यंत लागू राहतील. 1 जुलै 2021 पासून GLA च्या किमती 1.5 लाख रुपयांनी वाढतील.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार्स, मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट पर्याय

सिंगल चार्जवर 220km रेंज, होंडाची Two-Door इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

Maruti Swift ला मागे टाकत ‘ही’ कार ठरली देशात नंबर वन, लॉकडाऊन असूनही रेकॉर्डब्रेक विक्री

(much awaited Mercedes-Benz S-Class ready to launch, what will be special in luxurious sedan)

वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा
वादळी वाऱ्यासह अवकाळीच्या सरी बरसणार, मुंबईसह राज्यात सतर्कतेचा इशारा.
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा
दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक; त्रालमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा.
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस
गुडघे टेकून फोन केला म्हणून युद्धविराम - मुख्यमंत्री फडणवीस.
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार
बलुच आर्मीकडून पाकिस्तानी लष्करावर पुन्हा हल्ला, 14 सैनिकांना केलं ठार.
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.