मारुती कंपनीच्या कार खरेदीवर मिळवा ५५ हजार रुपयांची सूट, लवकर फायदा घ्या

तुम्ही नवीन वर्षाच्या आधी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता मारुतीची कार खरेदी केल्यास ५५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

मारुती कंपनीच्या कार खरेदीवर मिळवा ५५ हजार रुपयांची सूट, लवकर फायदा घ्या
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 7:26 PM

तुम्ही नवीन वर्षाच्या आधी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता मारुतीची कार खरेदी केल्यास ५५,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. वर्षाच्या शेवटी कार डीलर्स त्यांच्या मॉडेल एमवाय २०२४ कारचा स्टॉक संपवण्याचा प्रयत्न करतात. अशा तऱ्हेने लोकांना कार खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. मारुती सुझुकी एरिना लाइनअपमध्ये मिळणाऱ्या सवलतीचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

डे कारवरील डिस्काउंटमध्ये ऑल्टो आणि सेलेरियो, ब्रेझा एसयूव्हीचा या गाड्यांचा समावेश आहे. मारुती प्रत्येक व्हेरियंटवर शानदार ऑफर्स देत आहे. जाणून घ्या कोणती कार खरेदी केल्यावर तुम्ही जास्त पैसे वाचवू शकता.

Maruti S-Presso या गादीवर मिळते सर्वात जास्त सूट

S-Presso कार खरेदी केल्यास मोठी सूट मिळू शकते. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर ५५,००० रुपयांपर्यंत, CNG व्हेरिएंटवर ४५,००० रुपयांपर्यंत फायदे मिळू शकतात. मारुतीच्या उर्वरित कारवर ही तुम्हाला वेगवेगळी सूट मिळत आहे, खालील सर्व ऑफर्स पहा.

हे सुद्धा वाचा

Maruti Wagon R आणि Maruti Swift

Maruti Wagon R ही कर तुमच्या बजेटमध्ये पहिली पसंती असू शकते, कंपनी या कारवर ४९,७०० रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. या कारच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवर वेगवेगळी सूट मिळत आहे.Maruti Wagon Rच्या १.० लीटर असलेल्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये ४५,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तर १.२ लीटर असलेल्या व्हेरियंटवर तुम्हाला ४९,७०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. वॅगन आर कारच्या CNG व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर त्यावर तुम्हाला ४०,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.

जर तुम्ही मारुती स्विफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कारवर तुम्हाला ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. कंपनी त्यांच्या सध्याच्या जनरेशन मॉडेलवर ५०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. तर या कारच्या CNG व्हेरियंटवर तुम्हाला २५,०००रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Maruti Brezza आणि Alto K10

जर तुम्ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये कार शोधत असाल तर Brezza हा त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यावर तुम्हाला १५,००० ते २२,००० रुपयांची सूट दिली जात आहे. तसं पाहिलं तर वेगवेगळ्या शहरांमध्ये ही सवलत वेगवेगळी असू शकते. मारुती ऑल्टो के१० वरही तुम्हाला भरपूर सूट मिळत आहे.

Maruti Alto K10 वर सूट

Maruti Alto K10 वर ५१,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Maruti Alto K10 चे पेट्रोल व्हेरियंट खरेदी करणाऱ्यांना यावेळी अधिक सवलतीचा लाभ मिळत आहे. या कारवर तुम्ही ५१,००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला CNG व्हेरियंट घ्यायचा असेल तर यावर ४०,००० ते ४५,०००रुपयांची सूट मिळू शकते.

लक्षात घ्या की या डिस्काऊंट ऑफर्स तुमच्या लोकेशननुसार व्हेरिएंटनुसार बदलू शकतात. कार खरेदी करण्यापूर्वी आपल्या परिसरातील मारुती सुझुकीच्या डीलरशिपला भेट द्या आणि सर्व ऑफर्स आणि अटी काळजीपूर्वक तपासा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.