ना Hero,TVS पण नाही, सगळे राहिले मागे ! या ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटरची झाली सर्वाधिक विक्री

OLA इलेक्ट्रिकने अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे, परंतु फार कमी कालावधीत कंपनीने बाजारात चांगली पकड निर्माण केली आहे.

ना Hero,TVS पण नाही, सगळे राहिले मागे ! या ब्रँडच्या इलेक्ट्रिक स्कूटरची झाली सर्वाधिक विक्री
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 2:25 PM

नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची (electric scooter) मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसते. मागील मार्च महिना देखील अनेक कंपन्यांसाठी अतिशय अनुकूल होता, परंतु अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर (two wheeler) सेगमेंटमध्ये प्रवेश केलेल्या ओला इलेक्ट्रिकने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या कंपनीने मार्च महिन्यात 27,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली असून, स्कूटरच्या विक्रीच्या बाबतीत मोठमोठ्या दिग्गज कंपन्याना (big companies) मागे टाकले.

कंपनीने असा दावा केला आहे की, या महिन्यात, ब्रँडने सलग सातव्या महिन्यात सर्वाधिक स्कूटर विकून विक्री चार्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

ओला इलेक्ट्रिकने एका निवेदनात असे म्हटले आहे की, कंपनीने मार्च महिन्यात 27,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे. यासह मार्च महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनीचा हिस्सा वाढून 30 टक्क्यांवर पोहोचला आहे. ओलाने अलीकडेच S1 पोर्टफोलिओ श्रेणी 6 मॉडेल्सपर्यंत वाढवली आहे. कंपनीने 2KWh, 3KWh आणि 4KWh बॅटरी पॅकद्वारे संचालित Ola S1 Air चे 3 नवीन प्रकार लॉन्च केले आहेत, ज्याची डिलिव्हरी जुलै 2023 पासून सुरू होईल.

वेगाने वाढत आहे एक्सपिरियन्स सेंटर :

ओला इलेक्ट्रिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण भारतभर एक्सपिरियन्स सेंटर (Experience Center) उघडण्याच्या शर्यतीत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सध्या भारतभर 400 हून अधिक एक्सपिरियन्स सेंटर्स आहेत आणि अलीकडेच कंपनीने देशातील प्रमुख शहरांमध्ये केवळ एका दिवसात 50 नवीन एक्सपिरियन्स सेंटर सुरू केली आहेत. या केंद्रांवर, ग्राहक एकाच छताखाली ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची मोठी रेंज पाहू शकतात आणि त्यांचा अनुभव घेऊ शकतात.

OLA चा इलेक्ट्रिक स्कूटर रेंज :

OLA च्या इलेक्ट्रिक व्हेईकल पोर्टफोलिओमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. कंपनीच्या बेस मॉडेल S1 Air ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये इतकी आहे, तर S1 मॉडेलची किंमत 99,999 रुपये आहे. तसेच S1 Pro ची किंमत रुपये 1,39,999 (एक्स-शोरूम) आहे. या तिन्ही स्कूटर अनुक्रमे 101 किमी, 128 किमी आणि 170 किलोमीटरच्या रेंजसह येतात. जरी त्यांची ARAI सर्टिफाइड रेंज जास्त असली तरी कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती देखील दिली आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.