Ola Electric Scooter | Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर इतक्या स्वस्तात? उद्यापासून सुरु होत आहे विक्री..

Ola Electric Scooter | Ola ने 15 ऑगस्ट रोजी Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणली आहे. त्याची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 99,000 रुपये आहे. ही Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे आणि तिचा टॉप स्पीड 95 kmph आहे. ओला वेबसाइटवर उद्यापासून ही स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Ola Electric Scooter | Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर इतक्या स्वस्तात? उद्यापासून सुरु होत आहे विक्री..
ओलाची स्वस्त स्कूटर उद्या बाजारातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 1:08 PM

Ola Electric Scooter | भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला (Ola) इलेक्ट्रिक आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर विकण्यास सुरुवात करणार आहे. कंपनी 2 सप्टेंबरपासून प्रत्येकासाठी ओला एस 1 (Ola S1) ची परचेस विंडो उघडणार आहे. ओलाने 15 ऑगस्ट रोजी लेटेस्ट Ola S1 लाँच केली होती त्याची एक्सशोरूम किंमत 99,000 रुपये इतकी आहे. भारतातील ग्राहक उद्यापासून त्याच किमतीत Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरचा, (Electric Scooter) मर्यादित स्टॉक खरेदी करू शकतात. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Pro सारख्याच प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरचे 70,000 युनिट्स आधीच विकले गेले आहेत. त्याच वेळी Ola S1 ची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये कमी किमतीत अनेक चांगले पर्याय ग्राहकांसमोर निर्माण झालेले आहेत. या स्कूटरच्या माध्यमातून युजर्स केवळ डेली युजच नाही तर अगदी व्यावसायिक  सामान वाहून नेण्यासाठीही तिचा वापर करीत आहे.

Ola S1 पॉवर आणि रेंज

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3kWh इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. या पॉवरमुळे, Ola S1 पूर्ण चार्ज केल्यावर 141 किमी अंतर कापू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक राइडिंग मोडमध्ये येते. यामध्ये ग्राहकांना इको मोड मिळेल, जो 128 किमीची रेंज देईल, तर नॉर्मल मोड 101 किमीची रेंज देईल. Ola S1 चा स्पोर्ट्स मोड 90 किमीची रेंज देतो. Ola S1 चा टॉप स्पीड 95 kmph असल्याचा कंपनीचा दावा आहे

दरम्यान, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला कंपनीने जारी केलेले सर्व सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. यात Ola चे नवीन MoveOS 3 सॉफ्टवेअरचा देखील समावेश आहे. Ola S1 प्रोडक्शन कंपनीच्या फ्युचर फॅक्टरीत केले जाईल. हा जगातील सर्वात मोठा दुचाकी कारखाना असल्याचा दावा ओलाने केला आहे. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये येईल.

हे सुद्धा वाचा

डिझाइन आणि फीचर्स

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाईन Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर सारखीच आहे. यात एलईडी डीआरएल, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि एलईडी टेललाइटसह एलईडी हेडलॅम्प मिळतात. ओला इलेक्ट्रिक देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार बनवण्यात गुंतले आहे. ओलाचा दावा आहे, की ही कार फक्त 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेईल आणि एका चार्जवर 500 किमीची रेंज असेल.

ईव्हीचे मार्केट वाढले

भारतीय टू-व्हीलर मार्केट सध्या गरम आहे. त्यातच पेट्रोलचे वाढते दर पाहता, आता इलेक्ट्रीक स्कूटरचेमार्केट शेअर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये कमी किमतीत अनेक चांगले पर्याय ग्राहकांसमोर निर्माण झालेले आहेत. या स्कूटरच्या माध्यमातून युजर्स केवळ डेली युजच नाही तर अगदी व्यावसायिक  सामान वाहून नेण्यासाठीही तिचा वापर करीत आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.