Electric scooter मध्ये स्फोट, एकाच कुटुंबातील 7 जण रुग्णालयात, Video
या कंपनीच्या Electric scooter मध्ये आग लागण्याच ताज प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. जवळपास 1.50 लाख रुपये किंमतीच्या या इलेक्ट्री स्कूटरमध्ये स्फोट कसा झाला? या बाबत कुटुंबाकडून काय सांगण्यात आलय, जाणून घ्या.
Electric scooter fire | एक वेळ अशी होती की, इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे ग्राहकांच्या मनात भिती निर्माण झाली होती. मध्यंतरी इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या घटना कमी झाल्या. आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्फोट झाला. त्यात घराच मोठ नुकसान झालय. कुटुंबातील 7 सदस्य जखमी झाले आहेत. हे प्रकरण रायपूरच्या छत्तीसगडमधील कृष्णा नगरच आहे. डॉक्टर फैजन यांच्या कुटुंबासोबत ही घटना घडली. ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हा स्फोट झाला. S1 Pro च मॉडेल होतं. डॉक्टर फैजन यांच्या बहिणीने दुर्घटनेनंतर नुकसानीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय ई-स्कूटरमध्ये आग लागल्यामुळे घर आणि सामानाच खूप नुकसान झालं. व्हिडिओ क्लिपमध्ये आणखी काही टू व्हिलर दिसतायत. आगीमुळे त्या गाड्याच सुद्धा नुकसान झालय. मे 2023 मध्ये ही इलेक्ट्रिक स्कूटर विकत घेतली होती. स्कूटर विकत घेतल्यानंतर एकवर्षाच्या आत ही घटना घडलीय.
ओव्हर चार्जिंगमुळे आग लागली का?
इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावली होती. रात्री 1 वाजल्यानंतर झोपायला गेले. त्यानंतर काही तासाने ओला इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली. डॉक्टर फैजन यांनी सांगितलं की, चार्जिंगबद्दल मी ओलाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांनी सांगितलेलं की, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो कट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. आग लागलेली ओला इलेक्ट्रिक स्कूटर ओव्हर चार्ज केली नव्हती, तरीही ही घटना घडली. या बद्दल कंपनीच काय म्हणण आहे? ते सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
View this post on Instagram
Ola S1 Pro ची किंमत आणि रेंज किती?
ओला एस1 प्रो ची किंमत 1.40 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते. यात 4kWh बॅटरी पॅक आहे. याच वजन 125 किलोग्राम आहे. ई-स्कूटरचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे. बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर 195 किलोमीटर अंतर कापू शकते.