ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (GSRTC) 9 मीटरच्या 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला गुजरात परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर
इलेक्ट्रिक बस
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 8:11 PM

मुंबई : ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला (Olectra Greentech) गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (GSRTC) 9 मीटरच्या 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टवर (GCC) अतिरिक्त 50 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्याचा आदेश आहे. या 50 इलेक्ट्रिक बसेस 12 महिन्यांच्या कालावधीत दिल्या जातील. कंपनी कराराच्या कालावधीत या बसेसची देखभाल देखील करेल. (Olectra wins 50 EV bus order from GSRTC)

या नवीन आदेशासह, ऑलेक्ट्राकडे एकूण 1350 इलेक्ट्रिक बसेसच्या ऑर्डर आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे एमडी के. व्ही. प्रदीप म्हणाले की, “त्यांना गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 50 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे”. या नवीन ऑर्डरमुळे, आमच्या ऑर्डर बुकचा आकडा सुमारे 1350 बसेसपर्यंत पोहोचला आहे. आम्ही आधीच सुरतमध्ये बस चालवत आहोत. या नव्या आदेशामुळे आता गुजरात राज्यात त्यांच्या 250 इलेक्ट्रिक बसेस असतील.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज इलेक्ट्रिक बस

या 9 मीटर एसी बसमध्ये प्रवासी आरामात प्रवास करू शकतो. यात इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशनसह 33 अधिक एक ड्रायव्हर अशी आसन क्षमता आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बसेस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. यात एक इमरजन्सी बटण, एक यूएसबी सॉकेट आहे. बसमध्ये बसवलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी ट्रॅफिक आणि प्रवासी भार (बसमधील एकूण वजन) परिस्थितीनुसार बसला 180-200 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्यास सक्षम करते. म्हणजेच सिंगल चार्जवर ही बस 180 ते 200 किलोमीटपर्यंत धावेल.

इलेक्ट्रिक बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. तसेच हाय-पॉवर एसी चार्जिंग सिस्टीम या बॅटरीला 3-4 तासांच्या आत पूर्णपणे रिचार्ज करण्यास सक्षम करते. आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी त्याला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल एयर सस्पेंशन देण्यात आले आहे.

इतर बातम्या

सिंगल चार्जवर 236 किमी रेंज, Simple Energy ची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, किंमत…

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनशी संबंधित महत्त्वाचे नियम (EV) जारी, जाणून घ्या सर्वकाही

पेट्रोल आणि डिझेल आता विसरा, तुमची कार पाण्याच्या मदतीने धावणार, जाणून घ्या

(Olectra wins 50 EV bus order from GSRTC)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.