सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च

भारतीय टू व्हीलर मार्केटमधील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. Ola S1 पासून ते Simple One पर्यंत अनेक दुचाकी यावर्षी सादर करण्यात आल्या. आता One Moto नावाच्या ब्रँडने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.

सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च
One Moto Electa (Photo: india.one-moto.com)
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 12:00 PM

मुंबई : भारतीय टू व्हीलर मार्केटमधील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. Ola S1 पासून ते Simple One पर्यंत अनेक दुचाकी यावर्षी सादर करण्यात आल्या. आता One Moto नावाच्या ब्रँडने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे, या स्कूटरचे नाव Electa असे आहे. या स्कूटरच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्या ही स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. तसेच, तिचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास इतका आहे. (One moto electric scooter Electa launched in india, it gives 150 km driving range on single charge)

भारतीय टू व्हीलर बाजारात ही स्कूटर Ola S-1 Pro, Simple One, Ather 450X, Bajaj Chetak EV आणि TVS iQube सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल.

One Moto Electa मध्ये 4 kW ची मोटर बसवली आहे, जी QS ब्रशलेस DC हब मोटर आहे. या मोटरच्या मदतीने ग्राहकांना 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग मिळतो. कंपनीच्या दाव्यानुसार, ही स्कूटर केवळ 3.3 सेकंदात 0-50 किमीचा वेग पकडते.

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर वन मोटो इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन क्लासिक आहे. हे डिझाईन तुम्हाला 90 च्या दशकाची आठवण होईल. या स्कूटरचा लूक बजाज चेतकसारखा आहे.

One मोटो इलेक्टाची किंमत

One Moto Electa च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, भारतात या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 2 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला मॅट ब्लॅक, शायनी ब्लॅक, ब्लू, रेड आणि ग्रे कलर ऑप्शन्स मिळतील.

बॅटरी कपॅसिटी

One Moto Electa मध्ये कंपनीने 72V आणि 45A डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. या स्कूटरची बॅटरी चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. या स्कूटरमध्ये तुम्हाला कमाल 150 किमीची रेंज मिळते. कंपनीने पुढील आणि मागील चाकांवर डिस्क ब्रेक दिले आहेत. कंपनी या स्कूटरच्या मोटर, कंट्रोलर आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी देखील देते.

या स्कूटरच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर तिचे नेट वेट 115 किलो आहे. तसेच, समोर आणि मागील बाजूस उपस्थित असलेल्या टायरचा आकार 90/90-12 इंच आहे.

इतर बातम्या

Yamaha 2022 मध्ये दोन शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या खासियत

Ola कडून हायपरचार्जर इन्स्टॉल करण्यास सुरुवात, ग्राहकांसाठी मोफत फास्ट चार्जिंग सुविधा

ईव्ही स्टार्टअप GT Force च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक सादर, जाणून घ्या दुचाकींची खासियत

(One moto electric scooter Electa launched in india, it gives 150 km driving range on single charge)

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.