Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best deal: निम्म्यापेक्षा कमी किमतीत होंडा ॲक्टिव्हा खरेदी करण्याची संधी

भारतात मोपेड दुचाकींमध्ये सर्वाधिक मागणी असलेली कोणती गाडी असेल तरी ती म्हणजे होंडा ॲक्टिव्हा. जबरदस्त लूक, भारदस्त बनावट, चांगला पिकअप, बूटस्पेस आदी विविध कारणांमुळे ॲक्टिव्हाला मोठी मागणी आहे. आता हीच ॲक्टिव्हा तुम्ही निम्म्यापेक्षाही कमी किमतीत खरेदी करु शकणार आहात.

Best deal: निम्म्यापेक्षा कमी किमतीत होंडा ॲक्टिव्हा खरेदी करण्याची संधी
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 12:37 PM

भारतातील दुचाकींच्या (Two wheeler) प्रकारांमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यातच मोपेड गाड्या पाहिल्यास त्यातही विविध कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याचे दिसून येत असते. परंतु या सर्व स्पर्धांमध्येही होंडाच्या ॲक्टिव्हाने (Honda Activa) आपले स्थान अबाधित ठेवत ती गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. बाजारात सध्या ॲक्टिव्हाची एक्सशोरुम (Ex-showroom) किंमत ही 85 हजार 581 रुपये इतकी आहे. यासोबत ग्राहकांना ड्रम ब्रेक्स आणि स्टील व्हील्स मिळतात. या लेखात आम्ही या दुचाकीच्या अशा डीलबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यात तुम्ही ही दुचाकी तीच्या मुळ किमतीच्या निम्म्याहून कमी किमतीत विकत घेउ शकणार आहात.

होंडा ॲक्टिव्हा स्कूटर आपली उत्तम कामगिरी, माईलेज आणि चांगल्या बूटस्पेससाठी प्रसिध्द आहे. नवीन ॲक्टिव्हामध्ये 109.51 सीसीचे इंजीन दिले गेले आहे. एक लीटर पेट्रोलमध्ये यात 50 किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज मिळू शकतो. सोबतच याचे वजन 107 किलोग्रम आहे. यात 5.3 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे. ॲक्टिव्हा 7.86 बीएचपीची पॉवर जनरेट करण्यासाठी सक्षम आहे.

बाइक देखो वेबसाइटवर लिस्टेड

बाइक देखो नावाच्या एका वेबसाइटवर ही ॲक्टिव्हा केवळ 20 हजार रुपयांमध्ये लिस्टेड आहे. नवीन ॲक्टिव्हाच्या तुलनेत ही किंमत निम्म्याहून कमी किमतीत या ठिकाणी मिळत आहे. ही स्कूटर सेकंड हँड कॅटेगिरीत लिस्टेड आहे. वेबसाइटवर या स्कूटरची काही फोटोही शेअर करण्यात आले आहे.

केवळ 23 हजार किमी रन

वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही स्कूटर केवळ 23 हजार किलोमीटर रन करण्यात आलेली आहे. हे 2012 चे मॉडेल असून फस्ट ऑनर स्कूटर आहे. ती दिल्लीच्या आरटीओमध्ये रजिस्टर करण्यात आलेली आहे. लिस्डेड फोटोंमध्ये ही ॲक्‍टिव्हा चांगल्या कंडिशनमध्ये असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ओएलएक्स, बाइक्स 24 आणि दुसरे अनेक वेबसाइटवर सेकंड हँड दुचाकींचे विविध पर्याय खरेदीदारांसाठी उपलब्ध आहेत. परंतु या सर्व वेबसाइटवरुन वाहन खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या कंडिशनबाबत स्वत: वाहन पाहून, चालवून खात्री करुन घेणे गरजेचे आहे.

हे लक्षात ठेवा

कुठलेही सेकंड हँड वाहन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या कंडिशनबद्दल योग्य माहिती घेणे आवश्‍यक आहे. वाहनाला प्रत्यक्ष पाहून, टेस्ट डाइव्ह घेउन वेळप्रसंगी एखाद्या मॅकॅनिकला दाखवून सर्व पध्दतीन वाहनाची तपासणी करुन घेणे आवश्‍यक आहे. या सोबत वाहनाचे संपूर्ण कागदपत्रदेखील पाहणे गरजेचे असते.

संबंधित बातम्या

Gold-silver prices: खुशखबर! सोने झाले स्वस्त, आजच खरेदी करा; जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव

एकाच वर्षात महागाई दुप्पट; दोन अंकांचे शिखर केले सर, 1953 नंतर सहाव्यांदा तर 25 वर्षांतील पहिली बेसुमार वाढ

Today petrol diesel rate : सलग विसाव्या दिवशी भाव स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.