8 कोटींच्या बेंटले कारमध्ये बॉलिवूडची दिग्गज जोडी; कशी आहे ही आलिशान कार
Ranbir Kapoor Alia Bhatt Luxury Cars: रणबीर कपूरने आलिशान सेडान बेंटले कंटिनेंटल जीटी खरेदी केली आहे. काही दिवसांपूर्वी तो त्याची पत्नी आलिया भट्ट हिच्यासह या कारमधून फेरफटका मारताना दिसला. आलिया आणि रणबीर दोघांना महागड्या कारची आवड आहे. जाणून घ्या या महागड्या कारविषयी...
बॉलिवूडची सुपरहिट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे केवळ त्यांच्या सुपरहिट सिनेमांसाठीच ओळखले जातात असे नाही. तर त्यांच्याकडील आलिशान कारसाठी पण ते ओळखले जातात. महागड्या, आलिशान कार ही पण त्यांची नवीन ओळख आहे. रेंजे रोव्हर एसयुव्ही पासून ते मर्सिडीज एएमजी जी63 सारख्या महागड्या कारचे हे कपल शौकीन म्हटले तर वावगं ठरु नये. या दोघांच्या गॅरेजमध्ये अजून एका नवीन कारची एंट्री झाली आहे. या कारचे नाव बेंटले कंटिनेंटल जीटी असे आहे. नुकतेच हे कपल एका पार्टीच्या निमित्ताने नवीन बेंटलेसह स्पॉट झाले. रणवीर सिंह कार चालवताना दिसला.
8 कोटींची बेंटले
गेल्यावर्षी रणबीरचा एनिमल सारखा ब्लॉक ब्लास्टर चित्रपट येऊन गेला. रणबीर कपूरची नवीन आलिशान कार बेंटले केंटिनेंटल जीटीची किंमत 8 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. काळ्या रंगाची ही कार पाहता क्षणीच लक्ष वेधून घेते. या कारमधील सीट लाल रंगाचे असल्याचे दिसून येते. कार आणि आतील इंटिरिअर एकदम आलिशान आणि चित्तवेधक आहे.
कशी आहे दमदार कार
रणबीर कपूरची नवीन आलिशान सेडान बेंटले कंटिनेंटल जीटीसी स्पीड एडिशन 12 मॉडल आहे. यामध्ये 5993 सीसीचे इंजिन आहे. ही कार 500 बीएचपी पॉवर आणि 660 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करण्यात सक्षम आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देणाऱ्या या आलिशान कारचे मायलेज 12.9 किलोमीटर प्रति लिटर आहे.
4 आसनी बेंटले कार
- रणबीर सिंहची नवीन आलिशान सेडान 4 आसनी आहे. या कारचा बाहेरील आणि ताली लूक एकदम जोरदार आहे. या कारमधील इंटिरिअर आणि फीचर्स पण कमाल आहे. या आलिशान कारमध्ये तुम्ही विचार पण केला नसेल इतक्या सुविधा आणि फीचर्स आहेत.
- रणबीर कपूर हा आलिशान कारचा प्रेमी आहे. त्याच्याकडे नवीन बेंटले कंटिनेंटल जीटीसह लँड रोव्हर रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी आरर8, मर्सिडीज एएमजी जी63 आणि ऑडी ए8एल सारख्या महागड्या कार आहेत.
- तर रणबीर कपूरची पत्नी आलिया भट्ट हिला पण महागड्या कारची आवड आहे. तिच्याकडे लँड रोव्हर वोग, बीएमडब्ल्यू7 सीरीज, ऑडी ए6, ऑडी क्यू5 आणि ऑडी क्यू7 सारखी वाहनं आहेत.