Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल

रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) गेल्या महिन्यात (15 फेब्रुवारी) भारतात लाँच केली होती.

Renault Kiger खरेदी करताय? इतके महिने वाट पाहावी लागेल
Renault Kiger
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 8:32 AM

मुंबई : रेनॉ इंडियाने (Renault India) त्यांची सब फोर मीटर SUV कायगर (Renault Kiger) गेल्या महिन्यात (15 फेब्रुवारी) भारतात लाँच केली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या कारची डिलीव्हरी सुरु करण्यात आली आहे. नवीन रेनॉ कायगरची एक्स-शोरूम किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते. तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 9.55 लाख रुपये इतकी आहे. ही कार लाँचिंगपासून भारतीय ग्राहकांचं लक्ष वेधून घेत होती. आता या कारला देशभरात ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. (Renault Kiger waiting period stretches up to 2 months and more)

काही आठवड्यांपूर्वी जे ग्राहक रेनॉ कायगरचं बुकिंग करु लागले होते, तेव्हा त्यांना डिलीव्हरीसाठी 4 ते 5 आठवडे वाट पाहावी लागत होती. या कारवर 28 दिवस ते 35 दिवसांपर्यंतचा वेटिंग पिरियड होता. आता हा वेटिंग पिरियड दुपटीने वाढला आहे. कारण आता रेनॉ कायगर बुक करणाऱ्यांना किमान 10 आठवडे वाट पाहावी लागू शकते. काही डिलरशिप्सकडून सांगण्यात आले आहे की, या कारसाठी दोन ते अडीच महिने वाट पाहावी लागू शकते. ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे रेनॉ कायगरचा वेटिंग पिरियडदेखील वाढला आहे.

दमदार इंजिन

रेनॉ कायगरमध्ये 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 99 bhp पॉवर आणि 160 Nm टॉर्क निर्माण करु शकतं. सोबतच 5 स्पीड मॅनुअल ट्रांसमिशन स्टँडर्डची सुविधा असेल. AMT सह सीवीटी ट्रांसमिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. रेनॉ कायगरमध्ये मल्टीसेंस ड्राइव्ह मोड फीचर देण्यात आलं आहे. ही कार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट मोडवर चालवता येईल.

Renault Kiger ही कार कंपनीने एकूण 4 वेरिएंटमध्ये सादर केली आहे. यामध्ये RXE, RXL, RXT आणि RXZ मॉडलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला रेनॉ कायगरच्या सर्व वेरियंट्सच्या किंमतीबाबतची माहिती देणार आहोत. जेणेकरुन त्यापैकी कोणतं वेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे, हे तुम्ही ठरवू शकाल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कारची निवड करु शकाल.

Kiger चे वेरिएंट्स RXE RXL RXT RXZ
Energy MT 5.45 लाख रुपये 6.14 लाख रुपये 6.60 लाख रुपये 7.55 लाख रुपये
Easy-R AMT 6.59 लाख रुपये 7.05 लाख रुपये 8.00 लाख रुपये
Turbo MT 7.14 लाख रुपये 7.60 लाख रुपये 8.55 लाख रुपये
X-Tronic CVT 8.60 लाख रुपये 9.55 लाख रुपये

बेस्ट एसयूव्ही?

या गाडीमधील इंस्ट्रूमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे. थ्री स्पोक स्टीयरिंग व्हील, 8 स्पीकर साउंड सिस्टम, फ्लोटिंग टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग पॅड, सिलेक्टिव ड्राइव्ह मोड, प्रीमियम क्वालिटी सीट्स, प्लास्टिक कवर्ड दरवाजे, फिलिप्स एयर प्यूरीफायर, रियर एसी वेंट्स, 405 लीटर बूट स्पेससारख्या अनेक फीचर्समुळे ही कार बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.

देखभालीसाठी कमी खर्च आणि उत्तम ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्सच्या अनुभवासाठी सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारची मागणी सध्या वाढली आहे. ग्राहकांचा वाढता कल लक्षात घेता अनेक कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीची सुविधा असणाऱ्या कारचे उत्पादन करत आहेत. त्यामुळेच जगप्रसिद्ध असेलेली फ्रान्सची कंपनी Renault ने आज कायगर (Kiger) ही एसयूव्ही बाजारात सादर केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एसयूव्हीची सुविधा असणारी ही आतापर्यंतची सर्वांत स्वस्त कार असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारची किंमत 5.45 लाख रुपये आहे. याआधी Nissan कंपनीची Magnite ही एसयूव्ही नुकतीच लॉन्च झाली होती. या करची किंमत 4.99 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार या करची किंमत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे Renault ची Kiger सर्वात स्वस्त एसयूव्ही ठरू शकते.

Renault Kiger चं कसं आहे डिझाइन?

या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल बोलायचं झालं तर एक स्कल्प्टेड टेलगेट, एक एलईडी टेल लँप क्लस्टर, रिफ्लेक्टरसह हाय माउंट स्टॉप दिवे, टेलगेट माउंटेड स्पॉइलर, वायपर आणि बम्पर असणार आहेत. इतकंच नाहीतर परवाना प्लेट रीसेस बम्परवर असेल. याच्या पुढच्या बाजूला ब्लॅक बम्पर क्लेडिंग, 16 इंच अ‍ॅलोय व्हील, ब्लॅक बी पिलरही देण्यात आलं आहे.

या गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. याशिवाय Apple Car Play आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, स्वयंचलित हवामान नियंत्रण, क्रूझ कंट्रोल, पुश बटण स्टार्ट आणि स्टॉप बटन्स, क्रूज़ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट आणि स्टॉप बटन, माउंटेड कंट्रोल्ससोबतच मल्टी-फंक्शनल स्टीअरिंग व्हील देण्यात आलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, Kiger ही भारतात तयार होणारं जागतिक उत्पादन असणार आहे. नवीन रेनॉ कायगर ही कार किया सोनेट, ह्युंदाई वेन्यू, मारुती सुझुकी विटारा ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा केयूव्ही 300 आणि इतर कार्ससाठी तगडा स्पर्धक असणार आहे.

या गाड्यांना टक्कर देणार

भारतीय बाजारात Kiger ची टक्कर ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite), किआ सोनेट (Kia Sonet), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) आणि मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) या गाड्यांशी होणार आहे.

इतर बातम्या

2 रुपयात 5 किमी धावणार, ‘ही’ इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्या

Kia ची इलेक्ट्रिक कार EV6 चा फर्स्ट लूक जारी, नव्या डिझाईनसह कार सादर होणार

तुमच्याकडे मारुती सुझुकीची ‘ही’ कार असल्यास सावध व्हा; क्रॅश टेस्टमध्ये नापास

(Renault Kiger waiting period stretches up to 2 months and mor
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.