Renault च्या गाड्यांवर 1.05 लाखांपर्यंत सूट; क्विड, डस्टर आणि ट्रायबरचा समावेश

Renault India ने निवडक BS6 कार्सवर डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये क्विड, ट्रायबरआणि डस्टर या गाड्यांचा समावेश आहे

Renault च्या गाड्यांवर 1.05 लाखांपर्यंत सूट; क्विड, डस्टर आणि ट्रायबरचा समावेश
Renault Car
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 8:10 AM

मुंबई : Renault India ने निवडक BS6 कार्सवर डिस्काऊंट ऑफर्स सादर केल्या आहेत. ज्यामध्ये क्विड (Kwid) हॅचबॅक, ट्रायबर सबकॉम्पॅक्ट MPV आणि डस्टर (Duster) कॉम्पॅक्ट एसयूव्ही या गाड्यांचा समावेश आहे. या वाहनांवर 1.05 लाख रुपयांपर्यंतचा विशेष लाभ देण्यात येत आहे. या खास ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, फायनान्स प्रॉफिट आणि लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण ग्राहकांना एक खास ऑफर आणि कॉर्पोरेट सवलतही दिली जात आहे. (Renault Special Offer get rs 1.05 lakh discount on Kwid, Duster and Triber)

नवीन Renault कार खरेदी करण्यास इच्छुक खरेदीदार 31 मार्च 2021 पर्यंत या ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. या ऑफर्स देशभरातील वेगवेगळ्या डिलरशिपवर भिन्न असू शकतात. कार निर्माता कंपनी क्विड आणि ट्रायबरवर 5.99 टक्के विशेष दराने फायनॅन्स स्कीम देत आहे. रेनॉ क्विड ही कंपनीची एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 50 हजार रुपयांच्या ऑफर्ससह सूचीबद्ध करण्यात आली आहे. यामध्ये 20,000 रुपयांपर्यंतची रोख सवलत, 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंतच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे.

ट्रायबर एमपीव्हीवर 60,000 रुपयांचा डिस्काउंट

केवळ कॉर्पोरेट कंपन्या आणि PSUs च्या मंजूर अप्रूव्ह्ड लिस्टसाठी 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे. या व्यतिरिक्त 5,000 रुपयांचा ग्रामीण प्रस्ताव फक्त शेतकरी, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना लागू आहे. ट्रायबर एमपीव्हीवर 60,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळत आहे. त्यात 30,000 रुपये रोख सवलत, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 10,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. व्हेरिएंटनुसार प्रॉफिटदेखील स्वतंत्रपणे देण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांना 10,000 रुपये कॉर्पोरेट बोनस किंवा ग्रामीण ग्राहकांना 5 हजार रुपयांची खास ऑफर देखील मिळू शकेल. कॉर्पोरेट ऑफर केवळ कॉर्पोरेट्स आणि PSUs च्या रेनॉ अप्रूव्ह्ड लिस्टवर लागू होते.

डस्टरवर 75,000 रुपयांची सूट

या महिन्यात डस्टरच्या दोन्ही वेरिएंट्सवर विशेष फायदे लागू आहेत. एसयूव्हीचे 1.3 लिटरचा टर्बो वेरिएंट 75,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीत उपलब्ध आहे, ज्यात 30,000 रुपये रोख लाभ 30,000 रुपयांपर्यंतचा विनिमय (एक्सचेंज) लाभ आणि 15,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे. एक्सचेंज बेनिफिट्स फक्त RXS आणि RXZ व्हेरिएंटवर दिले जातात. कारमेकर 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटदेखील देत आहे. दुसरीकडे 1.5 लिटर पेट्रोल वेरिएंटवर एकूण 45,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. यात 30,000 आणि 15,000 रुपयांचा फायनॅन्स प्रॉफिट आणि लॉयल्टी बेनिफिटचा समावेश आहे.

इतर बातम्या

9 मार्चला नव्हे ‘या’ दिवशी लाँच होणार बहुप्रतीक्षित Electric Jaguar I-Pace, बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी

सिंगल चार्जवर 420 KM धावणार, Volvo ची C40 Recharge इलेक्ट्रिक कार सादर

Renault Kiger चा भारतीय बाजारात धुमाकूळ, अवघ्या एका दिवसात विक्रमी 1100 युनिट्सची डिलीव्हरी

(Renault Special Offer get rs 1.05 lakh discount on Kwid, Duster and Triber)

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.