Renault भारतात नवीन SUV लाँच करणार, Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV ला टक्कर

Renault एक नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी रेनॉल्ट इंडियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून माहिती शेअर केली आहे.

Renault भारतात नवीन SUV लाँच करणार, Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV ला टक्कर
Renault Arkana
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 7:28 AM

मुंबई : Renault एक नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी रेनॉल्ट इंडियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून माहिती शेअर केली आहे. कंपनीने आपल्या आगामी SUV कारची माहिती शेअर केली आहे, या कारचे नाव Arkana आहे. म्हणजेच कंपनी लवकरच ही SUV कार बाजारात आणू शकते. तथापि, कंपनीने अद्याप कोणत्याही टाइमलाइनचा उल्लेख केलेला नाही. (Renault to launch new SUV in India, rival for Hyundai Creta, Kia Seltos and MG Astor SUV)

फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्ट इंडियाने अलीकडेच आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे, कंपनीने एक टीझर शेअर करत लिहिले आहे की “आम्ही #movember साठी तयार आहोत. तसेच चेक-अप आणि बुकिंगबाबत कंपनीने संकेत दिले आहेत. या कारचे नाव अर्काना कूप एसयूव्ही असे आहे. मात्र, कंपनीने नाव किंवा इतर माहिती दिलेली नाही.

रेनॉल्ट अर्काना पहिल्यांदा 2019 मध्ये सादर करण्यात आली होती. ही कार CMF-B मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्यावर रेनॉल्ट डस्टर आणि निसान किक्सचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल तयार केलं जाण्याची अपेक्षा आहे. ही पाच सीटर कार आहे. ही कार आधीच जागतिक बाजारपेठेत लॉन्च केली गेली आहे आणि आता ती भारतात लाँच केली जाऊ शकते. भारतात ही कार Hyundai Creta, Kia Seltos आणि MG Astor SUV सारख्या गाड्यांना जोरदार टक्कर देईल.

अर्कानाची लांबी 4,545 मिमी, रुंदी 1,820 मिमी, उंची 1,565 मिमी आणि व्हीलबेस 2,721 मिमी आहे. तसेच, या कारला 208 मिमीचा ग्राउंड क्लीयरन्स देखील मिळतो, जो डस्टरपेक्षा जास्त आहे. अर्कानाचे केबिन इंटीरियर तुम्हाला डस्टर एसयूव्ही कारची आठवण करून देईल. भारतात येणाऱ्या आगामी SUV कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto फीचर्ससह 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम तसेच 9.3 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असेल. यात 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, बोस ऑडिओ सिस्टम आणि अॅम्बियंट कलर देखील मिळेल.

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर Renault ने 1.3-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असलेली Arkana SUV जागतिक बाजारपेठेत सादर केली आहे. ही कार 150 पीएस पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. ही ऑल-व्हील-ड्राइव्हसह देखील उपलब्ध आहे. तथापि, कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही की, भारतात लॉन्च होणारी ही कार अर्काना असेल, की वेगळी कार ऑफर केली जाईल.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Renault to launch new SUV in India, rival for Hyundai Creta, Kia Seltos and MG Astor SUV)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.