Royal Enfield च्या या बाईकवर रुबाबात फिरा, मायलेजची चिंता सोडा

Royal Enfield | रॉयल एनफिल्डच्या बाईक दुसऱ्या बाईकच्या तुलनेत महागड्या असतात. या बाईकमध्ये मायलेजची मोठी समस्या असते. म्हणजे या बाईक पेट्रोल अधिक पितात. त्यामुळे अनेक जण इच्छा असून पण ही बाईक खरेदी करत नाहीत. पण रॉयल एनफिल्डची ही बाईक त्यात उजवी ठरते.

Royal Enfield च्या या बाईकवर रुबाबात फिरा, मायलेजची चिंता सोडा
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 11:12 AM

नवी दिल्ली | 20 January 2024 : तरुणाईमध्ये रॉयल एनफिल्डची मोठी क्रेझ आहे. पण अनेक बाईकर्स रॉयल एनफिल्ड महागडी असल्याने आणि मायलेज मिळत नसल्याने तिच्याकडे पाठ फिरवतात. पेट्रोलचा भाव आकाशाला भिडलेले आहेत. तर या बाईकला जास्त पेट्रोल लागत असल्याने पण अनेक जण इच्छा असून या दमदार दुचाकीपासून दूर राहतात. पण रॉयल एनफिल्डची ही बाईक तुम्हाला निराश करणार नाही. ही बाईक रॉयल एनफिल्डमध्ये मायलेज आणि किंमतीत उजवी ठरते. कोणती आहे ही बाईक?

Royal Enfield Hunter 350

रॉयल एनफिल्डची सर्वात स्वस्त बाईक हंटर 350 तुमचा हा समज थोडाफार तरी खोटा ठरवते. या बाईकची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये आहे. ही बाईक तुम्हाला 36.5 km प्रति लिटरचा मायलेज देईल, असा दावा करण्यात येतो. रॉयल एनफिल्डने ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये दाखल केली आहे. त्याविषयी जाणून घेऊयात..

हे सुद्धा वाचा

Hunter 350 : रेट्रो व्हेरिएंट

हंटर 350 ही एक अर्बन क्रूझर बाईक आहे. यामध्ये फोर्क गेटर्स आणि वायझरसह ब्लॅक-आऊट इंजिन मिळते. ब्लॉक पॅटर्नचा वापर करुन ती स्क्रँबलर होते. ही बाईक केवळ दोन रंगात फॅक्ट्री ब्लॅक आणि फॅक्ट्री सिल्व्हरमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या बाईकला 1.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स – शोरुम किंमतीत बाजारात उतरवले आहे.

Hunter 350 : मेट्रो आणि मेट्रो रेबेल

मेट्रो रेबेलमध्ये ग्राहकांना रेबेल ब्लॅक, रेबेल ब्लू आणि रेबेल रेड कलरचा पर्याय मिळतो. या बाईकची एक्स-शोरुम किंमत 1,68,900 रुपयांपासून सुरु होते. तर मेट्रो डॅपर मालिकेत डॅपर व्हाईट, डॅपर एश आणि डॅप ग्रे अशा रंगात ही बाईक उपलब्ध आहे. डॅपर मालिकेची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1,63,900 रुपये आहे.

फीचर्स आणि वैशिष्ट्ये

हंटर 350 ला कंपनीने मॉडर्न J-सीरीज प्लेटफॉर्मवर विकसीत केले आहे. ग्राहकांना यामध्ये 349cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. यामध्ये 5 स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्डने अर्बन आणि सबअर्बन थीममधअये एक्सेसरीज उपलब्ध केली आहे. रेट्रोमध्ये सिंगल चॅनल, मेट्रोत ड्युएल चॅनल ABS, LED टेल लाईट आणि राऊंड टर्न इंडिकेटर मिळतात. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये स्विच गिअर आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.