रॉयल एनफील्ड मोठ्या धमाक्याच्या तयारीत, आज जाहीर होईल Royal Enfield Himalayan 450 ची प्राइस
2023 Royal Enfield Himalayan Price : रॉयल एनफील्डच्या या अपकमिंग बाइकच्या ऑफिशियल लॉन्चला आता थोडा वेळ बाकी आहे. या बाइकच्या किंमतीचा आज म्हणजे 24 नोव्हेंबरला खुलासा होईल. या मोटरसायकलमध्ये तुम्हाला काय खास पाहायला मिळेल? जाणून घ्या.

मुंबई : 2023 Royal Enfield Himalayan लॉन्च होण्यासाठी आता फक्त काही वेळ बाकी आहे. 24 नोव्हेंबर म्हणजे आजपासून सुरु होणाऱ्या RE Motoverse मध्ये अपकमिंग बाइकच्या किंमतीचा खुलासा होणार आहे. ऑफिशियल लॉन्चआधी रॉयल एनफील्डने आपल्या या बाइकचे सर्व फिचर्स जाहीर केले आहेत. आता फक्त किंमत किती? त्याची माहितीच बाकी आहे.
ही धाकड मोटरसायकल KTM 390 Adventure, BMW G 310 GS, Triumph Scrambler 400 X आणि Yezdi Adventure सारख्या बाइक्सना तोडीची टक्कर देईल. रॉयल एनफील्डची नवीन बाइक तुम्ही तीन वेरिएंट्समध्ये मिळेल, Base, Pass आणि Summit
Royal Enfield Himalayan 450 च इंजिन डिटेल
रॉयल एनफील्डच्या अपकमिंग बाइकमध्ये 452 सीसी लिक्विड कूल्ड DOHC सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. जे 8000rpm वर 39.5 hp पावर आणि 5500rpm वर 40Nm पीक टॉर्क जेनरेट करेल. इंजिन 6 स्पीड ट्रांसमिशन आणि असिस्ट एंड स्लिपर कल्चसोबत येईल. कंपनीच हे आतापर्यंत सर्वात एडवांस इंजिन आहे.
ब्रेकिंग डिटेल्स
बाइकच्या फ्रंटला 43mm फॉर्क्ससह प्री-लोड एडजस्टेबल मोनोशॉक मिळेल. फ्रंटमध्येच 320mm डिस्क ब्रेक तेच रियरमध्ये 270mm डिस्क ब्रेक देण्यात येईल.
196 किलोग्रॅम वजनासह येणाऱ्या या मोटारसायकलमध्ये 17 लिटरची इंधन टाकी असेल. अपकमिंग मोटरसायकलच्या फ्रंटमध्ये 21 इंच आणि रियरमध्ये 17 इंचाचे व्हील्स देण्यात येतील.
फीचर्स
Royal Enfield Himalayan 450 मध्ये 4 इंचाच सर्कुलर टीएफटी इंस्ट्रूमेंट कल्सटर, गूगल मॅप्स सपोर्ट, स्विचेबल रियर ABS, राइडिंग मोड्स, एलईडी लायटिंग, डुअल-पर्पज रियर टेल लाइट, स्पोक्ड व्हील्स सारख्या सुविधा देण्यात येतील.
Royal Enfield Himalayan 450 Price: किंमत किती असेल?
रॉयल एनफील्डच्या या अपकमिंग मॉडलच्या किंमतीचा खुलासा अजून झालेला नाहीय. पण अंदाज असा आहे की, या बाइकची किंमत 2 लाख 80 हजारच्या (एक्स-शोरूम) आसपास असेल. ऑफिशियल किंमत लवकरच जाहीर होईल.