Royal Enfield | आली रे आली, रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक आली
Royal Enfield | भारतात रॉयल एनफिल्ड निओ रेट्रो आणि रेट्रो क्रूझर मोटरसायकलसाठी लोकप्रिय ठरत आहे. कंपनी आपल्या चार नवीन बाईक्सबाबत सध्या प्रचंड चर्चेत आहे. स्क्रॅम 411, नवीन क्लासिक 350 आणि हंटर 350 या बाइक्स सध्या ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. नुकतेच कंपनीने हंटर 350 लाँच केली आहे.
Royal Enfield | भारतीय ग्राहकांमध्ये रॉयल एनफिल्डबाबत (Royal Enfield) प्रचंड उत्सुकता आहे. कंपनीच्या विविध दुचाकी ग्राहकांच्या गळ्यातील ताईत आहे. ग्राहक स्टेटस सिंबॉल म्हणूनही कंपनीच्या मोटरसायकली खरेदी करीत असतात. त्यामुळे कंपनीदेखील ग्राहकांच्या पसंतीला पडतील अशा दुचाकींची निर्मिती करीत असते. भारतात रॉयल एनफिल्ड निओ रेट्रो आणि रेट्रो क्रूझर मोटरसायकलसाठी लोकप्रिय ठरत आहे. कंपनी आपल्या चार नवीन बाईक्सबाबत सध्या प्रचंड चर्चेत आहे. स्क्रॅम 411, नवीन क्लासिक 350 आणि हंटर 350 या बाइक्स सध्या ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. नुकतेच कंपनीने हंटर 350 लाँच केली आहे. कंपनीचा दावा आहे, की ती लवकरच आपल्या इलेक्ट्रिक बाइकसह (Electric motorcycle) ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी वाढली आहे. कारपासून बाईक आणि स्कूटरपर्यंत विविध व्हेरिएंटमध्ये इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्यात येत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित होत आहे. या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रॉयल एनफिल्ड आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक आणणार असून ही अपकमिंग बाईक बुलेटसारखी दिसेल की नाही याबाबत उत्सुकता आहे. आयशर मोटर्सचे सीईओ सिद्धार्थ लाल (Siddharth lal) यांनी इलेक्ट्रिक बाईकशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती दिली आहे.
बाइकची माहिती दृष्टिक्षेपात
सीईओ म्हणाले, येत्या 3 ते 4 वर्षात रॉयल एनफिल्ड आपली इलेक्ट्रिक बाईक आणेल. रॉयल एनफिल्ड इव्हीच्या संदर्भात आपली योजना आखत आहे. इलेक्ट्रिक बाईकच्या डेव्हलपमेंटला वेळ लागत असला तरी ती नक्की येइल. एका चार्जमध्ये ही बाईक 100 ते 150 किमीच्या रेंजमध्ये असू शकते. इलेक्ट्रिक बाईक जवळपास 350 सीसीच्या पोर्टफोलिओमध्ये असेल.
हंटर 350 बनवण्यासाठी लागली 6 वर्षे
सीईओ सिद्धार्थ लाल यांनी इलेक्ट्रिक बाइक्सबाबत अनेक खुलासे केले असून ते म्हणाले, की रॉयल एनफिल्डला त्याच्या इलेक्ट्रिक बाइकबाबत कुठलीही घाई करणार नाही. योग्य नियोजन झाल्यावर बाइकबाबत अधिक माहिती सांगण्यात येणार आहे. या शिवाय सध्या कंपनी आपल्या अपकमिंग बाइकवर काम करीत असून ती लवकरच ग्राहकांच्या भेटीला येइल. हंटर 350 तयार करण्यासाठी रॉयल एनफिल्डला 6 वर्षे लागली. या बाइकची तयारी 2016 मध्ये सुरू झाली. हा कालावधी पाहता इलेक्ट्रिक बाईक यायला वेळ लागेल.
Royal Enfield Hunter 350ची चर्चा
भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफील्ड हंटर 350 ही लाँच करण्यात आली आहे. या आकर्षक बाईकचे फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही बाईक लाँच होण्यापूर्वीच चर्चेत होती. बाईक लव्हर या नव्या वाहनाची वाट पाहत होते. बाईकच्या रेट्रो प्रकाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.50 लाख रुपये आहे. उच्च-विशिष्ट मॉडेल मेट्रो डॅपर प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 1.64 लाख रुपये आहे आणि मेट्रो रिबेलच्या टॉप-एंड प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 1.68 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.