Royal Enfield : रॉयल एनफील्डची सर्वात स्वस्त बुलेट!,जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
रॉयल एनफील्डच्या सर्वात स्वस्त बुलेट क्रुजर बाइकची माहिती या लेखातून देणार आहोत. रॉयल एनफील्डचे सर्वात स्वस्त मॉडेल बुलेट 350 आहे. 346 सीसीची ही बाइक 5 स्पीड मॅन्यूअल गिअरमध्ये उपलब्ध आहे.
मुंबई : भारतीय दुचाकी बाजारात रॉयल एनफील्डचा (Royal Enfield) दबदबा सर्वांनाच माहिती आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील देशांमध्ये रॉयल एनफील्डच्या नावाने दुचाकींची विक्री होत असते. रॉयल एनफील्डचे भारतात एकूण 7 मॉडेल उपलब्ध आहेत. यात बुलेट 350 (Bullet 350) पासून ऑफ रोडिंगसाठी हिमालयन सारख्या नावांचाही समावेश होतो. जर तुम्ही देखील बुलेटचे चाहते आहात, आणि बुलेट खरेदी करण्याच्या विचारात असाल तर मॉडेलला घेउन तुमच्या मनातील गोंधळ या लेखातून दूर करणार आहोत. रॉयल एनफील्डच्या सर्वात स्वस्त (cheapest) बुलेट क्रुजर बाइकची माहिती या लेखातून देणार आहोत. रॉयल एनफील्डचा सर्वात स्वस्त मॉडेल बुलेट 350 आहे. 346 सीसीची ही बाइक 5 स्पीड मॅन्यूअल गिअरमध्ये उपलब्ध आहे. या बाइकचं वजन साधारणत: 191 किलोग्राम आहे. या बाईकची माहिती पुढील 10 मुद्दयांच्या आधारे घेउ या.
1) रॉयल एनफील्डची बुलेट 350 मॉडेल तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
2) बुलेट 350 स्टँडर्ड, बुलेट 350 केएस आणि बुलेट 350 इएस यांचा त्यात समावेश होतो.
3) या तीन व्हेरिएंटमध्ये सर्वात बजेट मॉडेल बुलेट 350 स्टँडर्ड आहे.
4) बीएस 6 इंजिनने सज्ज हे मॉडेल 19.1 बीएचपी आणि 25 एनएमचे टॉर्क जनरेट करते.
5) या व्हेरिएंटमध्ये स्पोक व्हील्स मिळतील.
6) दिल्लीमध्ये बुलेट 350 स्टॅडर्डची ऑनरोड किमत 1.68 लाख रुपये आहे.
7) बुलेट 350 मॉडेलमध्ये कंपनीने 13.5 लीटरचे टँक दिले आहे.
8) या मॉडेलमध्ये फ्रंटमध्ये डिस्क आणि रिअरमध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत.
9) या मॉडेलचे तीन व्हेरिएंट 6 वेगवेगळ्या रंगांत उपलब्ध आहेत.
10) कंपनीच्या दाव्यानुसार, हे मॉडेल 38 किमी प्रतिलीटरचा मायलेज देते.