AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

eBikeGo ने बुधवारी Rugged इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात G1 आणि G1+ या दोन व्हर्जन्समध्ये लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे.

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत...
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 3:56 PM

मुंबई : eBikeGo ने बुधवारी Rugged इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात G1 आणि G1+ या दोन व्हर्जन्समध्ये लाँच केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे. G1+ ची किंमत 89,999 रुपये आहे. विशेष म्हणजे दोन्ही किंमतीत FAME II सबसिडीचा समावेश आहे. मात्र, राज्यस्तरीय अनुदानाच्या अंमलबजावणीनंतर किमती आणखी कमी होतील. देशातील वेगाने वाढत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, ही स्कूटर तिचा परफॉर्मन्स आणि हाय रेंजमुळे चमत्कार करू शकते, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (Rugged Electric scooters launched in india, 160 km range in single charge)

Rugged इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दोन 2 kWh बॅटरी आहेत ज्या बदलण्यायोग्य आहेत. eBikeGo ने दावा केला आहे की, बॅटरी 3.5 तासात चार्ज होऊ शकते आणि त्याची रेंज सुमारे 160 किलोमीटर आहे. यात 3kW मोटर देखील आहे जी इलेक्ट्रिक स्कूटरला 70 किमी प्रतितास वेगाने धावण्यास मदत करते. EBikeGo चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इरफान खान म्हणाले, दीर्घकाळ केलेला अभ्यास आणि तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातील सर्वात टिकाऊ, इंटेलिजेंट आणि मजबूत इलेक्ट्रिक मोटो-स्कूटर लाँच केल्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

कंपनीचा दावा

Rugged इलेक्ट्रिक स्कूटरची स्टोरेज क्षमता 30 लीटर इतकी आहे आणि यात अँटी-थेफ्ट फीचर दिले असल्याचा कंपनीचा दावा आहे. ई-स्कूटर रिमोटली अनलॉक करणे आणि चालवण्यासाठी कंपनीच्या Rugged अॅपचा वापर केला जाऊ शकतो. या स्कूटरमध्ये 12 सेन्सर देखील आहेत. 4G, BLE, CAN बस, GPS/IRNSS, 42 इनपुट/आउटपुट, सीरियल पोर्ट आणि एक सर्वसमावेशक मॉड्यूलर सेन्सर संच, ही जगातील सर्वात प्रगत 2W IoT सिस्टिम आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतात डिझाइन आणि निर्मित, ebikeGo असा दावा करते की, Rugged इलेक्ट्रिक स्कूटर तिच्या नावाप्रमाणेच, देशातील आव्हानात्मक रस्त्यांवर धावू शकते. कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी आहे. कंपनी आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी चेसिसवर सात वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. ही ईव्ही कोइंबतूरमध्ये तयार केली जाईल. कंपनीच्या वेबसाइटवरुन ग्राहक Rugged इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग 499 रुपयांच्या रिफंडेबल अमाउंटसह करु शकतात.

इतर बातम्या

Honda ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 130 किलोमीटर रेंज

देशातील 400 शहरांमध्ये OLA 1 लाख इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरु करणार

Simple One इलेक्ट्रिक स्कूटरला अवघ्या 4 दिवसात 30,000 बुकिंग्स, 1947 रुपये देऊन तुम्हीही करु शकता बुक

(Rugged Electric scooters launched in india, 160 km range in single charge)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.