मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम, कंपनीच्या विक्रीत कमालीची वाढ, या गाड्यांना आहे मागणी

मार्च महिन्यात कंपनीने एकूण 11,597 वाहनांची निर्यात केली असून ती मागील वर्षीच्या मार्चच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ 2,104 वाहनांची निर्यात केली होती. (Sales of Maruti Suzuki's small cars increase in March, there is a demand for these cars)

मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम, कंपनीच्या विक्रीत कमालीची वाढ, या गाड्यांना आहे मागणी
मारुती सुझुकीच्या छोट्या मोटारींची मार्चमध्ये धूम
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:46 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीसाठी मार्च महिना एक शानदार महिना ठरला आहे. आज कंपनीने गेल्या मार्च महिन्यात विकल्या गेलेल्या वाहनांचा आकडा सादर केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात कंपनीने 1,67,014 वाहनांची विक्री केली आहे, जी मागील वर्षाच्या मार्चच्या तुलनेत 99% जास्त आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने एकूण 83,792 वाहने विकली होती. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी 1,49,518 वाहने देशांतर्गत बाजारात विकली गेली आहेत, तर कंपनीतर्फे विटारा ब्रेझा आणि बलेनोची 5,899 युनिट्सचा पुरवठा कंपनीने टोयोटोला केला आहे, जेणेकरून याचा वापर रिबॅज्ड अर्बन क्रूझर आणि ग्लान्झासाठी वापरू शकतील. तर मार्च महिन्यात कंपनीने एकूण 11,597 वाहनांची निर्यात केली असून ती मागील वर्षीच्या मार्चच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीने केवळ 2,104 वाहनांची निर्यात केली होती. (Sales of Maruti Suzuki’s small cars increase in March, there is a demand for these cars)

तथापि, 2020-21 आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 1,457,861 वाहनांची विक्री केली आहे, जी मागील आर्थिक वर्ष 201-20 च्या तुलनेत 6.7% कमी आहे. या आर्थिक वर्षात विक्रीत घट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सध्याचे कोरोना साथीचे संकट आहे. मागील वर्षी अनेक महिने वाहनांचे उत्पादन व विक्री बंद होती, त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला आहे.

बाजारात या कार आहेत लोकप्रिय

मारुती सुझुकीच्या परवडणाऱ्या व बजेट कार देशभर प्रसिद्ध आहेत आणि कंपनीच्या एन्ट्री लेव्हल सेगमेंटला सर्वाधिक मागणी आहे. कंपनीने गेल्या मार्चमध्ये ऑल्टो (Alto) आणि एस-प्रेसो (S-Presso) सारख्या छोट्या मोटारींच्या 24,653 वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्चमध्ये केवळ 15,988 इतकी होती. तर वॅगन आर, स्विफ्ट, सेलेरिओ, इग्निस, बालेनो, डिजायर या 82,201 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षी मार्च महिन्यात 40,519 इतकी होती. तथापि, गेल्या वर्षी मार्चमध्ये मध्यम आकाराच्या सेडान कार सियाझच्या विक्रित घट झाली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात 1,863 युनिट्सच्या तुलनेत 1,628 कारची विक्री झाली.

युटिलिटी सेगमेंटची मागणी

देशातील युटिलिटी सेगमेंटची मागणी सर्वाधिक वाढत असून मारुती सुझुकीलाही याचा फायदा झाला आहे. कंपनीने गेल्या मार्चमध्ये या विभागातील आपल्या विटारा ब्रेझा, अर्टिगा, एस-क्रॉस आणि एक्सएल -6 मॉडेल्सच्या एकूण 26,174 युनिटची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये 11,904 कारची विक्री केली होती. कंपनीच्या प्रसिद्ध व्हॅन इकोने मार्चमध्ये 11,547 युनिट विकल्या असून गेल्या वर्षी मार्चमध्ये फक्त 5,966 कारची विक्री झाली होती. (Sales of Maruti Suzuki’s small cars increase in March, there is a demand for these cars)

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सने नोंदवला नवा विक्रम, गेल्या नऊ वर्षात मार्चमधील सर्वाधिक विक्री

मार्चमध्ये ऑटो कंपन्यांची धमाल, जाणून घ्या ह्युंडाई, टोयोटा आणि एमजी मोटरची किती झाली विक्री

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.