कार घ्यायची पण सेडन की हॅचबॅकमध्ये गोंधळ आहे? येथे मिळतील तुमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे

सेडन कारमध्ये प्रीमिअम क्लासचा अनुभव जाणवतो. तर दुसरीकडे हॅचबॅक कार सहजतेने कुठेही पार्क करता येते, वर्दळीच्या ठिकाणाहून हॅचबॅक कार बाहेर काढतानाही काहीही अडचण येत नाही. या शिवाय दोघांच्या मायलेजमध्येही बदल आहेत.

कार घ्यायची पण सेडन की हॅचबॅकमध्ये गोंधळ आहे? येथे मिळतील तुमच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 10:47 AM

जर तुम्ही एक नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्यात एक प्रश्‍न निर्माण होणे अगदी साहजिक आहे. कार घेताना ती हॅचबॅक (Hatchback car) सेगमेंटमध्ये घ्यावी की सेडन? यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होउन कार खरेदीही लांबणीवर पडत असते. खर पाहिल तर या दोन्ही प्रकारच्या कार्समध्ये आपआपली वेगळी वैशिष्ट्ये आहेत. सेडन कारमध्ये (Sedan car) प्रीमिअम क्लासचा अनुभव जाणवतो. तर दुसरीकडे हॅचबॅक कार सहजतेने कुठेही पार्क करता येते, वर्दळीच्या ठिकाणाहून काढतानाही काहीही अडचण येत नाही. सेडन की हॅचबॅक कार घ्यावी याबाबतचा तुमच्या मनातील गोंधळ या लेखाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, यासह दोन्ही प्रकारातील फीचर्सही (Features) तुम्हाला सांगणार आहोत.

काय असते हॅचबॅक कार?

हॅचबॅक एक वेगळ्या प्रकारची बॉडी टाइप कार असते. यात तीन सेगमेंट उपलब्ध असून त्यात, स्मॉल हॅचबॅक, हॅचबॅक आणि प्रीमिअम हॅचबॅक आदी प्रकारांचा समावेश होतो. प्रीमिअम हॅचबॅक कारमध्ये जास्त बूट स्पेस, केबिनमध्येही चांगली मोकळी जागा देण्यात आलेली आहे. यासह अनेक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

हॅचबॅक कारची वैशिष्ट्ये

– जास्त स्पेस मिळते. – रिसेल व्हॅल्यूदेखील जास्त असते. – लहान बोनेट, गाडी सहज कुठेही पार्क होते. – सेडन कारच्या तुलनेत जास्त मायलेज.

हॅचबॅकमधील नकारात्मक बाबी

– सेडन कारच्या तुलनेत कमकुवत इंजिन असते. – सेडनच्या तुलनेत कमी बूट स्पेस दिलेला असतो.

काय आहे सेडन कार?

सेडन कारमध्ये हॅचबॅक कारच्या तुलनेत चांगला बूट स्पेस देण्यात आलेला असतो. या कार्समध्ये बूट स्पेस वेगळा असतो. सेडन कारमध्ये चार ते पाच लोक सहज बसू शकतात.

सेडन कारची वेशिष्ट्ये

– जास्त इंजिन पॉवरच्या मदतीने ग्राहक स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव घेउ शकतात. – हॅचबॅकच्या तुलनेत जास्त लेगरुम असतो. हॅचबॅकपेक्षा सेडन गाड्यांचा कमी आवाज येतो.

नकारात्मक बाबी

– हॅचबॅक कार्सच्या तुलनेत जास्त महाग असतात. – हॅचबॅकच्या तुलनेत कमी मायलेज मिळतो. – पार्किंग करताना अनेक अडचणी निर्माण होतात.

हॅचबॅक कारच का घ्याव्या?

हॅचबॅकमध्ये आपली अनेक वैशिष्ट्ये असतात. हॅचबॅक कार्स मोठ्या शहरामध्ये वापरण्यासाठी जास्त उपयुक्त ठरत असतात. तर दुसरीकडे सेडन कार पार्किंग करण्यासाठी तसेच मायलेजसाठी अडचणीच्या ठरत असतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.