AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल क्लाउडच्या माध्यमातून मिळणार सिरीयल 1 ई-बाईकला नवीन बूस्टर

सॉफ्टवेअर सक्षम ई-बाईक युजर्सना त्यांच्या फिरस्तीची माहिती घेण्यास, डेटा संकलित करण्यास आणि सुरक्षितता पुरविण्यास बरीच मदत करणार आहे. त्याच प्रमाणे गुगल मॅपच्या माध्यमातून ही ई-बाईक सभोवतालच्या रस्त्यांचे मॅपिंगदेखील करणार आहे.

गुगल क्लाउडच्या माध्यमातून मिळणार सिरीयल 1 ई-बाईकला नवीन बूस्टर
Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 8:45 PM

गुगल क्लाउडच्या (google cloud) मदतीने हार्ले डेव्हिडसनच्या सिरीयल 1 (serial 1) मधील बहुप्रतीक्षीत नवीन ई-बाईकबाबतची माहिती लिक झाली आहे. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार हार्ले डेव्हिडसनची ही ई-बाईक  (eBike)  नवीन सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांसह लवकरच बाजारात दाखल होणार आहे. गुगल क्लाउडसह कंपनीच्या नवीन भागीदारीद्वारे सिरीयल 1 ही इलेक्ट्रिक ई-बाईक कंपनीव्दारे लाँच करण्यात येत आहे. हार्ले डेव्हिडसनमधून बाहेर पडलेल्या इलेक्ट्रिक बाईक कंपनीने प्रिमियम ई-बाईकची दुसरी जनरेशन लाइनअप लाँच केली आहे. परंतु यापेक्षा सर्वात मोठे बदल कंपनीच्या अॅपमध्ये करण्यात येणार आहेत. अद्ययावत बाईक्स गुगल क्लाउडसह सिरीयल 1च्या नवीन भागीदारीद्वारे प्रदान केलेल्या नवीन सॉफ्टवेअर वैशिष्ट्यांसह ग्राहकांच्या भेटीला येत आहेत.

व्हर्च्युअल गार्ग फीचर

दरम्यान, कंपनीचे म्हणणे आहे, की गुगल क्लाउडने आपला नवीन ‘स्ट्रॅटेजिक ईमोबिलिटी पार्टनर’ म्हणून सिरीयल 1 ची निवड केली आहे, म्हणजे ई-बाईक निर्माता गुगलची सॉफ्टवेअर उत्पादने त्याच्या वाहनांमध्ये समाविष्ठ करणारी पहिली कंपनी असेल. सॉफ्टवेअर सक्षम ई-बाईक  युजर्सना त्यांच्या फिरस्तीची माहिती घेण्यास, डेटा संकलित करण्यास आणि सुरक्षितता पुरविण्यास बरीच मदत करणार आहे. त्याच प्रमाणे गुगल मॅपच्या माध्यमातून ही ई-बाईक सभोवतालच्या रस्त्यांचे मॅपिंगदेखील करणार आहे. त्याच प्रमाणे गुगल मॅपच्या माध्यमातून ही ई-बाईक सभोवतालच्या रस्त्यांचे मॅपिंगदेखील करणार आहे. या ई-बाईकमध्ये व्हर्च्युअल गार्ग नावचे फीचर देण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्ता त्याची ई-बाईक डिजिटल पध्दतीने ट्रॅकदेखील करणार आहे. ई-बाईकचे डॅशबोर्ड रपेटची माहिती, ई-बाईक स्पीड, अंतर आदी विविध गोष्टींची माहिती संकलित करणार आहे. सिरीयल 1 अॅपमध्ये युजर्स टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन पाहू शकतात, राइड डेटा संकलित करू शकतात आणि त्यांच्या ई-बाईक सेफ्टी फीचर्सही नियंत्रित करू शकणार आहात.

GPS तंत्रज्ञानाचा वापर

गुगल क्लाउड बाईक आणि वापरकर्त्याच्या स्मार्टफोनमध्ये मजबूत कनेक्शन दिसून येणार आहे. बहुतेक ई-बाईक स्मार्टफोन अॅपशी कनेक्ट होण्यासाठी ब्लूटूथ वापरतात, परंतु सिरियल 1 च्या बाईकमध्ये ब्लूटूथ व्यतिरिक्त सेल्युलर आणि GPS तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सिरीयल 1 ही एक स्वतंत्र इलेक्ट्रिक बाइक कंपनी असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये हार्ले डेव्हिडसनमधून बाहेर पडली. तिच्या सध्याच्या लाइनअपमध्ये चार बाइकचा समावेश आहे, ज्यांची किंमत 3,399 ते 4,999 डॉलर एवढी आहे. मोश/सीटी, सिटी बाईक आणि कम्युटर रॅश/सीटी अशी ब्रँडची नावे आहेत, जी तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक ड्राइव्‍ह मोटरसह 250W बॅटरी आहे, जी सतत पॉवर जनरेट करू शकते आणि 20mph चा टॉप स्पीड देउ शकते. या नवीन ई-बाईकच्या माध्यमातून वापरकर्त्यांना अत्यंत सुरक्षीत, अत्याधुनिक ई-बाईक राइडचा अनुभव घेता येणार आहे. सोबतच ज्यांना विविध ठिकाणी जावून मॅपिंग करण्याची आवड आहे. त्यांच्यासाठीदेखील ही ई-बाईक असत्यंत फायदेशिर ठरणार असल्याची कपंनीकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.