Nano Car : सोलार नॅनो कार भारीच, गाडी चालवण्यासाठी इंधन आणि चार्जिंगचं आता नो टेन्शन

टाटा नॅनो कारची निर्मिती बंद झाली असली तरी त्याचं आकर्षण आजही कायम आहे. काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक नॅनो कार चर्चेत आली होती. त्यानंतर सोलार नॅनो कारची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Nano Car : सोलार नॅनो कार भारीच, गाडी चालवण्यासाठी इंधन आणि चार्जिंगचं आता नो टेन्शन
धूपsss! सौर उर्जेवर धावणारी नॅनो कार, सोशल मीडियावर गाडीची एकच चर्चाImage Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 4:23 PM

मुंबई : इंधनाच्या वाढत्या किमती पाहता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. ग्राहकांची गरज ओळखून एकापेक्षा एक सरस अशा गाड्या भारतात लाँच होत आहेत. भविष्याच्या दृष्टीकोनातून पश्चिम बंगालमधील एका कारप्रेमीनं सौर उर्जेवर धावणारी कार मोडिफाय केली आहे. उद्योगपती मनोजित मंडळ जुन्या नॅनो कारचं सौर उर्जेवर धावणाऱ्या गाडीत रुपांतर केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या कारची जोरदार चर्चा रंगली आहे. पीटीआयने या नॅनो कारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

सोलार नॅनो कार 100 किमी धावण्यासाठी फक्त 30 रुपये खर्च येतो. टाटा नॅनो कार ही इलेक्ट्रिक कार आहे. या गाडीत लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी सोलर पॅनलच्या माध्यमातून चार्ज होते. या गाडीत इंजिन नाही यामुळे गाडी धावताना कोणताही आवाज येत नाही. ही गाडी 80 किमी प्रतितास वेगाने धावते.

उद्योगपती मनोजित मंडळ यांच्या मते, या प्रयोगासाठी सरकारकडून कोणतंच सहकार्य मिळालं नाही. पण लहानपणापासून अशी गाडी तयार करण्याचं स्वप्न होतं. इंधनाचे वाढते दर पाहता टाटा नॅनो कार मॉडिफाय करण्याचा निर्णय घेतलं.

“तुम्ही 100 रुपयात 30 किलोमीटर गाडी चालवतात. पण या गाडीचं उलटं आहे. ही गाडी तुम्ही 30 रुपयात 100 किमी चालवाल. कोणतंच प्रदूषण होत नाही. पर्यावरणासाठी हानिकारक नाही. यात इंजिन नाही. पण गियर सिस्टम आहे. चौथ्या गियरमध्ये 80 प्रतितास वेगाने गाडी धावते. “, असं मनोजित मंडळ यांनी सांगितलं.

“या गाडीमध्ये गियर आहे पण क्लच नाही.बाकी सर्व गोष्टी आहेत. विशेष म्हणजे यासाठी पेट्रोलची गरज नाही. याच्या छतावर एक सोलार पॅनेल आहे. त्याने बॅटरी चार्ज होते आणि त्यात पॉवर स्टोअर होते. पाच माणसं यात आरामात बसू शकतात.”, असंही मनोजित मंडळ यांनी पुढे सांगितलं.

टाटा मोटर्स कंपनीने 2008 साली कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार लाँच केली होती. गाडीची विक्री घटल्याने कंपनीने 2018 मध्ये या गाडीची निर्मिती बंद केली होती. नॅनो ही भारतातील सर्वात स्वस्त कार होती. या गाडीची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये इतकी होती.

ही गाडी रतन टाटा यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. बीएस 3 मानकानुसार ही गाडी डिझाईन करण्यात आली होती. मात्र सेफ्टी फीचर्स आणि अन्य काही कारणांमुळे या गाडीचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.