Mahindra Bolero | अधिक आकर्षक बनून येणार महिंद्राची लोकप्रिय बोलेरो, फिचर्ससह काय बदलणार? जाणून घ्या
New Mahindra Bolero India Launch Details | महिंद्रा बोलेरो भारताली लोकप्रिय SUV पैकी एक आहे. आता कंपनी या कारमध्ये नवीन अपडेट करण्याची जोरदार तयारी करत आहे. नव्या बोलेरोमध्ये काय-काय बदल करणार?. भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होणार? जाणून घ्या या बद्दलची सर्व डिटेल्स.
मुंबई : SUV ची चर्चा सुरु असेल, तर महिंद्रा बोलेरोच नाव घेतल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. या कारने गावापासून शहरापर्यंत ऑफ-रोडिंगमध्ये झेंडा रोवलाय. चांगली बाब म्हणजे बोलेरोची किंमतही बजेटमध्ये आहे. आजही ग्रामीण भागात नवीन कार विकत घेणाऱ्यांची पहिली पसंत महिंद्रा बोलेरोला असते.
महिंद्र बोलेरो कार वर्ष 2000 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली होती. या SUV ला मार्केटमध्ये येऊन 23 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दरम्यान बोलेरोला अनेकदा अपडेटही करण्यात आलय. आता पुन्हा एकदा ही SUV नव्या अवतारात येणार आहे. यात काय खास असेल, त्या बद्दल जाणून घेऊया.
सिटिंग ऑप्शन्स काय असतील?
नव्या बोलेरोला महिंद्राच्या नव्या प्लॅटफॉर्मवर बनवण्यात येईल. याला U171 कोडनेम देण्यात आलय. रिपोर्ट्सनुसार कंपनी नव्या बोलेरोच्या डिजाइन आणि फिचर्समध्ये खास अपडेट करणार आहे. या SUV ला वेगवेगळ्या सिटिंग ऑप्शन्समध्ये लॉन्च केलं जाणार आहे, असही बोलल जातय.
Mahindra Bolero Neo Plus
महिंद्रा बोलेरो वेगवेगळ्या सिटिंग ऑप्शनमध्ये आणल जाईल. यात एक 5-सीटर वर्जन असेल. त्याची लांबी 4 मीटर पेक्षा कमी असेल. हे मॉडेल विद्यमान बोलेरो आणि बोलेरो नियोला रिप्लेस करेल. त्याशिवाय एक थ्री-रो मॉडलही असेल. यात 7-सीटरचा ऑप्शन असेल. महिंद्रा बोलेरो नियो प्लस नावाने ही कार मार्केटमध्ये आणली जाऊ शकते.
Mahindra Bolero ची सेफ्टी
नव्या बोलेरोला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये चांगले सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. त्यासाठी बोलेरोमध्ये काही खास सेफ्टी फिचर्स जोडले जातील. नव्या बोलेरोला तिसऱ्या रो मध्ये Mahindra ScorpioN प्रमाणे फॉरवर्ड फेसिंग सीट्स दिल्या जातील. त्याशिवाय बोलेरोच 9-सीटर मॉडलही लॉन्च होऊ शकतं. जे फोर्स सिटीलाइन MUV ला टक्कर देईल. नव्या बोलेरोला वेगवेगळ्या व्हीलबेस ऑप्शनमध्ये लॉन्च केलं जाऊ शकतं.