पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा, सीएनजीच्या पर्यायांसह ‘या’ चार एसयुव्ही कार खरेदी करा
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पेट्रोल-डिझेलचे दरही रोज नवीन स्तर गाठत आहे. इंधनाच्या किंमती बघूनच चारचाकी वाहन घ्यावे, की न घ्यावे असा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु आता इंधनाचे वाढते दर पाहाता कार बनविणाऱ्या कंपन्यांनी सीएनजी पर्यायासह एसयुव्ही कार बाजारात आणण्याची तायारी सुरू केली आहे.
रोजच इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे इंधनाला पर्याय म्हणून कार निर्मात्या कंपन्या विविध पर्यायांची चाचपणी करताना दिसत आहेत. भविष्यातील इंधनाच्या मर्यादा लक्षात घेउन इलेक्ट्रिक कार, (Electric car) सीएनजीवर आधारीत कारला चांगले भविष्य असल्याचे कंपन्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच आता बहुसंख्य कंपन्या आपल्या कारला सीएनजीच्या (CNG) पर्यायासह बाजारात आणण्याच्या तयारीला लागल्या आहेत. कार प्रेमींमध्ये एसयुव्ही व्हेरिएंटच्या कारबद्दल प्रचंड आकर्षण असते. शिवाय या प्रकारच्या कारला चांगली मागणीदेखील आहे. परंतु इंधनाचे दर वाढत असल्याने पेट्रोल डिझेल (petrol diesel) व्हेरिएंटच्या कार विक्रीवर संकट आले आहे. परंतु ही मर्यादा ओळखून कंपन्यांनी आपल्या एसयुव्ही कारला सीनएनजी पर्यायासह बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. या लेखातून आपन संबंधित सीएनजी कारबद्दल माहिती घेणार आहोत.
किया सोनेट सीएनजी
कोरियन कंपनी असलेल्या कियाच्या सर्वच कार भारतात मोठ्या प्रमाणात पसंत केल्या जात आहेत. कियाच्या सोनेटची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. इंधनाचे वाढते दर व लोकांची सोनेटला मागणी पाहता कंपनी सोनेटची सीएनजी व्हर्जनची चाचपणी करीत असल्याची माहिती आहे. एका रिपोर्टनुसार, सीएनजीचे हे व्हेरिएंट मॅन्युअल गिअर बॉक्ससोबत असणार आहे. या कारची स्पर्धा मारुतीच्या विटारा ब्रेझासोबत केली जात आहे.
ह्युंडाई वेन्यू
ह्युंडई Aura च्या यशानंतर मिनी एसयूवी असलेल्या वेन्यूला सीएनजी व्हेरिएंटमध्ये बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही लहान एसयुव्ही 1.0 लीटर 3 सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजीनसह सीएनजीमध्येही उपलब्ध होईल, अशी आशा आहे. रेग्युलर व्हेरिएंटच्या तुलनेत ही कार काहीशी कमी पॉवर आणि टॉर्क ऑफर करेल अशी शक्यता आहे.
किया कॅरेंस सीएनजी
सोनेटसोबत किया आपली नवीन कार किया कॅरेंसलाही सीएनजी पर्यायात आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीचे या कारच्या सीएनजी व्हर्जनवर कामही सुरु असल्याचे समजते. कॅरेंस तीन रो असलेल्या एमपीव्ही सेगमेंटमधील कार आहे. 1.4 लीटर टर्बो इंजीन सोबत ही कार सीएनजी पर्यायातदेखील उपलब्ध होणार आहे. 1.4 टर्बोचार्जर्ड पेट्रोल इंजीन 140 पीएस आणि 242 एनएमचा टॉर्कची निर्मिती करते.
मारूती विटारा ब्रेझा
दरम्यान, 4 मीटर सेगमेंट किंवा मिनी एसयुव्हीमध्ये केवळ तीन पर्याय नसून ज्यांचे सीएनजी व्हेरिएंट येताय त्यांच्या व्यतिरिक्त मारुती विटारा ब्रेझाच्या सीएनजी व्हेरिएंटबद्दलही खूप चर्चा रंगत आहे. सोबत टाटा नेक्सॉनच्या सीएनजी व्हेरिएंटबद्दल विविध माहिती समोर येत आहे. अशा सर्व बातम्या समोर येत असल्या तरी वाढत्या इंधनाच्या दराला कंटाळलेल ग्राहक या सर्व कारच्या नवीन सीएनजी व्हेरिएंटबाबत खूप उत्सूक असल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ