स्कोडा-किया 7 सीटर कार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध? जाणून घ्या
तुम्हाला स्वत:साठी एसयूव्ही खरेदी करायची असेल पण बजेट 10 लाखांपेक्षा कमी असेल तर ही दोन्ही वाहने तुमच्यासाठी चांगली ठरू शकतात. किया, स्कोडा आणि पंच या 7 सीटर कार आहेत. तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत फॅमिली कार खरेदी करू शकता. जाणून घेऊया कोणती कार तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

10 लाखांपेक्षा कमी किंमतीत 7 सीटर कार मिळाली तर आनंदाला पारावार उरत नाही. जर तुमचं बजेट 10 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला SUV बाजारात मिळू शकतात. यामध्ये ह्युंदाई एक्सटर, किआ सोनेट, टाटा पंच, रेनो काइगर आणि निसान मॅग्नाइट सारख्या कारचा समावेश आहे.
आम्ही तुम्हाला किआ आणि स्कोडाचे फीचर्स, इंजिन आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. यानंतर कोणती कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल हे तुम्ही स्वत: ठरवू शकता.
स्कोडा Kylaq 7.89 रुपयांना उपलब्ध
5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येणाऱ्या या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर स्कोडा SUV च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. या गाडीच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.40 लाख रुपये आहे. स्कोडा Kylaq मध्ये 1.0 लीटर चे तीन सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 115bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करू शकते. यात 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सचा पर्याय आहे. 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर असलेले हे मॉडेल एक लिटर इंधनात 19.68 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते.
सुरक्षेसाठी या SUVमध्ये 6 एअरबॅग देण्यात आल्या आहेत. याशिवाय 25 हून अधिक अॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये 10 इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 8 इंचाचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो आणि सनरूफ सारखे फीचर्स मिळत आहेत. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. त्याची डिलिव्हरी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
किआ सोनेटची किंमत: 7.99 लाख रुपये
किआ सोनेटची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.92 लाख रुपये आहे. सोनेटमध्ये स्कोडा कायलॅकप्रमाणे 6 एअरबॅग्स देखील देण्यात आल्या आहेत. ABS, EBD, ESS, BAS, आयसोफिक्स चाइल्ड अँकर व्यतिरिक्त थ्री पॉईंट सीट बेल्ट, एलईडी फॉग लॅम्प, रियर पार्किंग सेन्सर, Adas Level-1 असे सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय
किआ सोनेटमध्ये 1.2 लीटर इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये 1.2 लीटर स्मार्टस्ट्रीम, 1 लीटर टर्बो पेट्रोल, 1.5 लीटर CRDI डिझेल इंजिनचा समावेश आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड आयएमटी ते 6-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.