AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 महिन्यांत एकही बाईक विकली गेली नाही, सुझुकीच्या ‘या’ बाईकचं प्रोडक्शन होणार बंद

सुझुकीची इंट्रूडर 155 भारतीय लोकांना फारशी आवडली नाही. या बाइकला बाजारपेठेत अनेक बाइक्सशी स्पर्धा करावी लागली ज्यामुळे तिचे भारतात पाळेमुळे घट होउ शकले नाहीत. बाजारात या गाडीची स्पर्धा बजाज अॅव्हेंजरशी होती, ब्रँड इमेज अनेक वर्षे जुनी असल्याने त्यामुळे कंपनीची ही बाईकही लोकांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरली. त्याची किंमत देखील अॅव्हेंजरपेक्षा खूप जास्त आहे.

6 महिन्यांत एकही बाईक विकली गेली नाही, सुझुकीच्या ‘या’ बाईकचं प्रोडक्शन होणार बंद
suzuki intruder
| Updated on: Jun 17, 2022 | 1:38 PM
Share

जपानी ऑटो कंपनी सुझुकीने 2017 मध्ये भारतात आपली खास दिसणारी बाईक सुझुकी इंट्रूडर 155 (Suzuki Intruder 155) लाँच केली होती. आता कंपनी ही बाईक बंद (Discontinue) करणार असून ती भारतात विकणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. सुझुकी इंट्रूडर 155 बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची विक्री न होणे हे आहे. डिसेंबर 2021 ते मे 2022 दरम्यान, त्याचे एकही युनिट विकले गेले नाही. तर त्याआधी नोव्हेंबरमध्ये या बाईकचे फक्त 16 युनिट्स (unit) विकले गेले होते. भारतीय बाजारपेठेत ही बाईक अपयशी ठरल्याची अनेक कारणे आहेत.

लोकांच्या पसंतीला उतरण्यास अपयशी

सर्वप्रथम, Suzuki Intruder 155 चे डिझाइन भारतीय रस्त्यांसाठी योग्य नसल्याचे दिसून आले. बाईकचे कर्व्ड बाजूचे पेनल आकर्षक दिसत असले तरी ते 155cc बाईकसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वजनदार असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. या कारणांमुळे लोकांना Intruder 155 फारशी आवडलेली दिसत नाही.

डिझाईनमध्ये अनेक शंका

150cc सेगमेंट बाईक ग्राहकांना इंट्रूडर 155 चे डिझाईन अद्यापही समजण्यास अवघड असल्याची चर्चा आहे. जसे, की यात त्रिकोणी हेडलॅम्प, अँगुलर ट्विन एक्झॉस्ट सिस्टीम देण्यात आली आहे. तसेच, बाईकचा मागील भाग खूप मोठा आहे, भारतीय बाजारात दाखल झालेल्या बाईक्सच्या तुलनेत हा आकार आकार भारतीय ग्राहकांना रुचला नाही.

अॅव्हेंजर सारख्या बाईकशी टक्कर

याशिवाय बाईकमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापरही लोकांना आवडला नाही, कारण कालांतराने त्याची चमक कमी होत जाते. बाजारात तिची स्पर्धा बजाज अॅव्हेंजरशी होती, पण तिची ब्रँड इमेज अनेक वर्षे जुनी आहे. त्यामुळे कंपनीची ही बाईकही लोकांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरली. त्याच वेळी, Suzuki Intruder 155 ची किंमत देखील Avenger पेक्षा खूप जास्त होती. दिल्लीत त्याची एक्स-शोरूम किंमत 1.28 लाख रुपये होती, तर बजाज अॅव्हेंजरची किंमत 1.12 लाख रुपये होती. जर ग्राहकाने त्याचे बजेट फक्त 10,000 रुपयांनी वाढवले तर त्याला अॅव्हेंजर 220 मिळेल. त्याची एक्स-शोरूम किंमत 1.38 लाख रुपये आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.