पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी
जर आपण पाऊस आणि चिखलामध्ये बाईक चालवत असाल आणि या सर्व गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या बाईकच्या मागील टायरमध्ये मडगार्ड लावला पाहिजे. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)
नवी दिल्ली : पाऊस कुणासाठी आनंद घेऊन येतो तर काहींना दुःख देऊन जातो. शेतकर्याला पाऊस आवडतो, तर बर्याच राज्यात जास्त पाऊस पडल्याने शेतकर्यांचे पीक उध्वस्त होते. वाहनांचीही तीच स्थिती आहे. जास्त पावसामुळे अपघाताची शक्यता वाढते. याशिवाय वाहनांच्या नुकसानीची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत, या येत्या पावसाळ्यात आपल्याला आपली बाईक कशी सुरक्षित ठेवता येईल आणि वापरण्यासाठी कोणत्या महत्वाच्या टिप्स आहेत. आपण पाच महत्वाच्या टिप्स फॉलो करुन आपल्या बाईकची काळजी घेऊ शकता. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)
फर्स्ट Aid किट
हवामान केव्हाही खराब होऊ शकते आणि या दरम्यान बाईक घसरण्याची शक्यताही खूप जास्त असते. अशा परिस्थितीत आपण जिथे जात असाल तेथे नेहमी प्रथमोपचार किट आपल्यासोबत ठेवा. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण स्वत: ची काळजी घेऊ शकता. प्रत्येक बाईक कंपनी बेसिक किट देते. म्हणून आपल्या बाईकमधून हे कधीही काढू नका आणि नेहमीच सोबत ठेवा.
मडगार्ड्स असल्याची खात्री करा
जर आपण पाऊस आणि चिखलामध्ये बाईक चालवत असाल आणि या सर्व गोष्टींपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या बाईकच्या मागील टायरमध्ये मडगार्ड लावला पाहिजे. कारण यामुळे तुम्ही तर सुरक्षित रहाल, पण मागच्या सीटवर बसलेला रायडरही सुरक्षित राहील. तसेच, आपण सामान मागे ठेवले असल्यास, त्यावर चिखलही जाणार नाही.
बॅटरी चेक करा
आजकाल प्रत्येक बाईक किकस्टार्टसह येते पण थंडीमुळे कधीकधी बॅटरी काम करीत नाही. त्यामुळे आपली बॅटरी नेहमीच चार्ज ठेवा. वायरिंगकडे नेहमी लक्ष द्या. बहुतेक बाईक वॉटर प्रूफ असतात पण मुसळधार पावसात यात पाणी जाऊ शकते.
हेडलाईट चेक करा
पावसाच्या थेंबामुळे बहुतेकदा आपला प्रवास सुखद होण्याऐवजी त्रासदायक ठरु शकतो. म्हणूनच जर आपल्या वाहनाची हेडलाईट चांगली असेल तर आपल्याला पावसाळ्यात कोठेही अंधारात जाताना काही अडचण उद्भवणार नाही आणि काही मीटर अंतरावरापर्यंत अगदी स्पष्ट दिसेल.
अँटी रस्ट वापरा
जर आपल्या बाईकमधील बहुतेक भाग लोखंडाचा असेल तर पावसाळ्यात आपल्याला ते जपावे लागेल. कारण बर्याचदा आपण पावसातून बाईक आणतो आणि तशीच पार्क करतो. अशा परिस्थितीत या भागांवर गंज चढण्याचा धोका असतो. म्हणून नेहमी आपल्या बाईकला अँटी रस्ट कोटिंग द्या म्हणजे तुमच्या बाईकचे सर्व पार्ट सुरक्षित राहतील आणि जास्त काळ टिकतील. (Take care of your bike in the rain, prepare these 5 important things)
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं विस्तारीकरण होणार, आराखडा सादर करण्याचे मंत्र्यांचे आदेश https://t.co/EXDXcaHhsz @AmitV_Deshmukh @CMOMaharashtra @OfficeofUT @InfoJalgaon @SPChandrapur #AmitDeshmukh #Jalgaon #Chandrapur #medicalcollege
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 2, 2021
इतर बातम्या
पुलवाम्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात भाजप नेते राकेश पंडिता यांचा मृत्यू