Altroz CNG ची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर! आवडती कार नव्या व्हेरिएंटमध्ये लाँच होणार?
Tata Motors च्या हॅचबॅक टियागो (Tiago) आणि कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या (Tigor) सीएनजी वाहनांविषयीच्या येत असलेल्या सर्व बातम्यांनंतर, आता प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉझच्या (Altroz) सीएनजी व्हेरिएंटची चर्चाही सुरु आहेत.

मुंबई : देशातील प्रमुख कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने (Tata Motors) आता सीएनजी सेगमेंटमध्येही अग्रेसर होण्याचे ठरवले आहे. आम्ही असे म्हणत आहोत कारण, कंपनीच्या हॅचबॅक टियागो (Tiago) आणि कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या (Tigor) सीएनजी वाहनांविषयीच्या येत असलेल्या सर्व बातम्यांनंतर, आता प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉझच्या (Altroz) सीएनजी व्हेरिएंटची चर्चाही सुरु आहेत. दरम्यान, या चर्चा सत्यात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. नुकताच या कारचा उत्सर्जन चाचणी किटसह (एमिशन टेस्टिंग किट) एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. (Tata Altroz CNG Spied With Emission Testing Kit, Launching Soon)
रशलेनने हा फोटो प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये Altroz च्या मागील बाजूस एमिशन टेस्टिंग किट बसवले आहे. कारच्या लुकमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. पण फोटो पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की, टाटा लवकरच बाजारात Altroz CNG लाँच करू शकते. मात्र, Altroz CNG लाँच करण्याबाबत टाटा मोटर्स कडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Altroz चे CNG व्हेरिएंट आले तर यामध्ये 1.2 लीटर थ्री-सिलिंडर नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन दिसेल. जे 86 अश्वशक्तीची उर्जा (हॉर्स पावर) आणि 113 न्यूटन मीटर पीक टॉर्क निर्माण करते. साहजिकच CNG मध्ये, कारचे पॉवर आउटपुट कमी होईल. अशा परिस्थितीत, Altroz CNG मध्ये 10-14 हॉर्स पावर कमी उर्जा उत्पादन करू होईल.
कशी आहे Tata Altroz? (पेट्रोल व्हेरिएंट)
अल्ट्रोज ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये, आपल्याला प्रीमियम क्वालिटीचे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. गाडीची केबिन स्पेस बऱ्यापैकी मोठी आहे. त्यामुळे मागच्या सीटवर बसलेले प्रवासी सहज आपले पाय पसरवून बसू शकतात. ही एक आधुनिक कार आहे. या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारला सुरक्षेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.
टाटाने मागील वर्षी जानेवारी महिन्यात ही लाँच केली होती. काही आठवड्यांतच ही कार लोकांच्या पसंतीस उतरली. परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे या कारची विक्री मंदावली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत या कारने विक्रमी आकडेवारी नोंदवली असून भारतीय ग्राहकांमध्ये अल्पावधित लोकप्रियता मिळवली आहे. प्रीमियम लुकबरोबरच तुम्हाला या कारमध्ये एक मजबूत इंजिन देखील मिळेल.
Tata Altroz चे फीचर्स आणि इंजिन
कंपनी ही कार 7 व्हेरिएंट आणि तीन इंजिन ऑप्शन्समध्ये देत आहे. यात पहिले 1.2 लीटरचे नॅचरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिन आहे जे 86ps पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. तर दुसरे 1.2 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे जे 110ps पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय तुम्हाला तिसरे 1.5 लीटर डिझेल इंजिन मिळेल जे 90ps पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करेल. या व्यतिरिक्त तुम्हाला या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.
या कारची किंमत 5.69 लाख ते 9.45 लाख रुपयांदरम्यान आहे. या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. याशिवाय सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एम्बियंट लायटिंग, स्टीयरिंग माउंट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, 4 एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर आणि स्पीड अॅलर्ट सिस्टम असे फीचर्स मिळतील.
इतर बातम्या
ओला इलेक्ट्रिक स्कूटरची कमाल! दोन दिवसांत तब्बल 1100 कोटींची कमाई
PHOTO | डस्टर ते हॅरियर पर्यंतच्या बेस्ट मिडसाईज एसयूव्हीवर मोठी सवलत, जाणून घ्या तपशील
(Tata Altroz CNG Spied With Emission Testing Kit, Launching Soon)