Tata Moters : टाटाच्या या गाड्यांवर मिळतोय बंपर डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
टाटा मोटर्सच्या या कारच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटवर 15 हजारांची रोख सूट दिली जात आहे, तर नियमित मॅन्युअल व्हेरिएंटवर 20 हजारांची रोख सूट दिली जात आहे.
मुंबई : जर तुम्हालाही टाटा मोटर्सची (Tata Mooters) कार आवडत असेल आणि तुम्ही या महिन्यात नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी अगदी योग्य काळ आहे, कारण कंपनी जूनमध्ये त्यांच्या वाहनांवर 35,000 रुपयांपर्यंतचे लाभ देत आहे. कोणत्या मॉडेल्सवर किती रुपयांची सूट दिली जात आहे? याबद्दल आपण जाणून घेऊया.
टाटा टियागोवर होणार इतकी बचत
या टाटा कारसह 35,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत, ज्यात 20,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे.
टाटा टिगोरवर मिळणार एवढी सूट
टाटा मोटर्सच्या या कारच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटवर 15 हजारांची रोख सूट दिली जात आहे, तर नियमित मॅन्युअल व्हेरिएंटवर 20 हजारांची रोख सूट दिली जात आहे. 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट या दोन्ही प्रकारांमध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच या कारवरही जूनमध्ये 35,000 रुपयांपर्यंतच्या सूटचा लाभ घेता येईल.
Tata Altroz वर होणार इतकी बचत
या टाटा कारच्या मॅन्युअल ट्रान्समिशन (पेट्रोल) व्हेरियंटवर 10,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे, तर पेट्रोल DCA व्हेरिएंटवर 15,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट या प्रकारांमध्ये समाविष्ट आहे. त्याचबरोबर या कारच्या डिझेल व्हेरियंटवर 15 हजारांची रोख सूट, 10 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजारांचा कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे.
टाटा हॅरियरवर सर्वाधिक सवलत
टाटा मोटर्सच्या या कारवर ग्राहकांना जास्तीत जास्त बचत होणार असून, या कारसोबत २५ हजारांचा एक्सचेंज बोनस आणि १० हजारांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.