लहान-मोठ्या खेड्यांमध्ये Tata Motors चं शोरुम उभं राहणार, प्रवासी वाहनांसाठी ‘अनुभव’ Mobile Showroom लाँच

टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज ग्रामीण ग्राहकांना घरपोच कार खरेदी अनुभव देणारे शोरूम ऑन व्‍हील्‍स 'अनुभव' सादर (‘Anubhav’ mobile showrooms) केले. ग्रामीण विपणन धोरणाशी बांधील राहत हा उपक्रम तहसील व तालुक्यांमधील कंपनीची पोहोच वाढवण्यास मदत करेल,

लहान-मोठ्या खेड्यांमध्ये Tata Motors चं शोरुम उभं राहणार, प्रवासी वाहनांसाठी ‘अनुभव’ Mobile Showroom लाँच
Tata Motors launches Anubhav showrooms
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 11:31 PM

मुंबई : टाटा मोटर्स (Tata Motors) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज ग्रामीण ग्राहकांना घरपोच कार खरेदी अनुभव देणारे शोरूम ऑन व्‍हील्‍स ‘अनुभव’ सादर (‘Anubhav’ mobile showrooms) केले. ग्रामीण विपणन धोरणाशी बांधील राहत हा उपक्रम तहसील व तालुक्यांमधील कंपनीची पोहोच वाढवण्यास मदत करेल, जेथे ग्रामीण लोकसंख्‍या आणि अर्थव्‍यवस्‍थेच्‍या संदर्भात उच्‍च क्षमता आहे. भारताच्या ग्रामीण भागामध्‍ये टाटा मोटर्स ब्रॅण्‍ड जागरूकता वाढवण्‍यासाठी देशभरात एकूण 103 मोबाइल शोरूम्‍स तैनात करण्‍यात आले आहेत. हे मोबाइल शोरूम्‍स विद्यमान डिलरशिप्‍सना ग्राहकांना घरपोच विक्री अनुभव देण्‍यास मदत करण्‍यासोबत कार्स व एसयूव्‍हींची न्‍यू फॉरेव्‍हर रेंज, अॅक्‍सेसरीजबाबत माहिती देण्‍यामध्‍ये, फायनान्‍स योजना उपलब्‍ध करून देण्‍यामध्‍ये, टेस्‍ट ड्राइव्‍ह बुक (Test Drive) करण्‍यामध्‍ये आणि एक्‍स्‍चेंजसाठी विद्यमान कार्सचे मूल्‍यांकन करण्‍यामध्‍ये देखील मदत करतील.

याप्रसंगी बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेडचे विक्री, विपणन व कस्‍टमर केअरचे उपाध्‍यक्ष राजन अम्‍बा म्‍हणाले, ”आम्‍हाला अनुभव उपक्रम सुरू करण्‍याचा आनंद होत आहे. हे आमच्या ब्रॅण्‍डला प्रगतीच्‍या दिशेने घेऊन जाण्‍यामध्‍ये आणि कार्स व एसयूव्‍हींची आमची न्‍यू फॉरेव्‍हर श्रेणी अधिक प्रमाणात उपलब्‍ध करून देण्‍यासोबत पारंपारिकरित्‍या पालन केले जाणाऱ्याया ब्रिक-अॅण्‍ड-मोर्टर सुविेधेच्‍या मॉडेलवरील आमची अवलंबता कमी करण्‍यामध्‍ये लक्षणीय पाऊल आहे.”

कंपनी ग्रामीण ग्राहकांशी कनेक्ट होणार

राजन म्हणाले की, “हे मोबाइल शोरूम्‍स आमच्‍या कार्स, फायनान्‍स योजना, एक्‍स्‍चेंज ऑफर्स इत्‍यादी बाबत मा‍हितीचा शोध घेत असलेल्‍या ग्रामीण ग्राहकांसाठी एक थांबा सोल्‍यूशन असतील. ते आमच्‍या ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवण्‍यासाठी आम्‍हाला ग्राहक अभिप्राय व डेटाची देखील माहिती देतील. भारताच्‍या ग्रामीण भागामधील विक्री देशामध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या एकूण पॅसेंजर वेईकल्‍समध्‍ये जवळपास 40 टक्‍के योगदान देतात आणि या संकल्‍पनेसह आम्‍हाला आमची पोहोच वाढवण्‍याचा, तसेच या बाजारपेठांमधील ग्राहकवर्गामध्‍ये वाढ होण्‍याचा विश्‍वास आहे.”

शोरूम ऑन व्हील्‍स

टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्‍स फुली बिल्‍ट वेईकल्‍स (एफबीव्‍ही) डिव्हिजनच्‍या कौशल्‍यासह ‘अनुभव – शोरूम ऑन व्हील्‍स’ अत्‍यंत विश्‍वसनीय टाटा इण्‍ट्रा व्‍ही 10 च्‍या आधारावर विकसित करण्‍यात आले आहे. डिलरशिप्‍स टाटा मोटर्सची देखरेख व मार्गदर्शनांतर्गत या मोबाइल शोरूम्‍सचे कार्यसंचालन पाहतील. सर्व डिलरशिप्‍सना या व्‍हॅन्‍स प्रवास करणा-या आणि लक्ष्‍य गाव किंवा तहसीलपर्यंत जाणा-या मार्गांसंदर्भात दर महिन्‍याला माहिती देण्‍यात येईल. या मोबाइल शोरूम्‍समध्‍ये सर्वोत्तम वापराकरिता हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी जीपीएस ट्रॅकर्स आहेत.

इतर बातम्या

Rohit Sharma New Car: रोहित शर्माने खरेदी केली भारताच्या जर्सीला साजेशी आलिशान कार, किंमत मुंबईतल्या 3BHK फ्लॅटएवढी

घरबसल्या शोरूममधून कार खरेदीचा अनुभव घ्या, MG Motor चा ‘एमजी एक्स्पर्ट’ प्लॅटफॉर्म लाँच

बहुप्रतीक्षित Skoda Slavia भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.