भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या ‘या’ छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ

टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात डिसेंबर 2020 मध्ये विक्रीच्या बाबतीत 21 टक्क्यांची वाढ साधली आहे.

भारतीय मार्केटमध्ये टाटाच्या 'या' छोट्या SUV चा धुमाकूळ, विक्रीमध्ये 21 टक्क्यांची वाढ
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 2:02 PM

मुंबई : टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात डिसेंबर 2020 मध्ये विक्रीच्या बाबतीत 21 टक्क्यांची वाढ मिळवली आहे. कंपनीने या महिन्यात 53,430 युनिट्सची विक्री केली आहे. पॅसेंजर व्हेईकल (प्रवासी वाहन) सेगमेंटमध्ये कंपनीने 23,545 युनिट्सचा सेल केला आहे. 2019 मध्ये हा आकडा 12,785 युनिट्स इतका होता. सोबतच कंपनीने 84 टक्के इयर ऑन इयर सेल साधला आहे. यामध्ये टाटा नेक्सॉन, टाटा टियागो आणि टाटा हॅरियरसारख्या मॉडेल्सचा सेल सर्वाधिक होता. या तीन कार्सपैकी नेक्सॉनला (Tata Nexom) सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

नेक्सॉनटाटा मोटर्सच्या या प्रसिद्ध कारची सर्वाधिक विक्री झाली आहे. कंपनीने डिसेंबर 2020 मध्ये नेक्सॉनच्या 6,835 युनिट्सची विक्री केली आहे. 2019 मध्ये ही संख्या 4,350 युनिट्स इतकी होती. त्यामुळे डिसेंबर 2020 मध्ये नेक्सॉन हे टॉप सेलिंग मॉडेल ठरलं आहे. टाटाची लोकप्रिय हॅचबॅक टाटा टिअॅगोच्या 6,066 युनिट्स विक्री झाली आहे. यासोबतच टाटा मोटर्सने गेल्या महिन्यातील देशातील टॉप ब्रँड्समध्ये तिसरं स्थान पटकावलं आहे.

टाटा नेक्सॉनचं डिझाईन ग्राहकांच्या पसंतीस उतरलं आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये तुम्हाला सनरूफ, पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय देण्यात आले आहेत, जे ऑटो ट्रांसमिशनसह येतात. Tata Nexon मध्ये 120hp पॉवर आणि 170Nm साठी 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 110hp आणि 260Nm सह बनवण्यात आलं आहे. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅनुअल किंवा एएमटीसह उपलब्ध आहे. नेक्सॉनची सुरुवातीची किंमत (एक्स-शोरूम) 6.99 लाख रुपये इतकी आहे.

दरम्यान, टाटाची ही छोटी क्रॉसओव्हर गाडी भारतातील पहिली अशी कार आहे. जिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. नेक्सॉनला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. टाटा मोटर्स कंपनी त्यांची प्रत्येक कार मजबूत कशी होईल, याकडे सर्वाधिक लक्ष देते. तसेच टाटाच्या टियागो आणि टिगॉरला क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

26 जानेवारीला टाटा जबरदस्त SUV लाँच करणार

Tata Motors कंपनी 26 जानेवारीला एक नवीन गाडी लाँच करणार आहे. या 7 सीटर SUV चं नाव Tata Gravitas असं आहे. ही गाडी टाटाच्याच हॅरियरप्रमाणे (TATA Harrier) बनवण्यात आली आहे. परंतु Gravitas मध्ये तुम्हाला जास्त सीट्स मिळणार आहेत. कंपनीने जेव्हा हॅरियर लाँच केली होती तेव्हाच 7 सीटर व्हेरियंटबाबत घोषणा केली होती. आता ती कार लाँच केली जात आहे.कंपनीने जेव्हा 7 सीटर एसयूव्हीची घोषणा केली होती तेव्हा सांगितलं होतं की, गाडीचं नाव वेगळं जरी असलं तरी ही कार हॅरियरप्रमाणेच बनवली जाणार आहे.

या गाडीमध्ये थोडेफार बदल केल जातील. दोन्ही एसयूव्ही ओमेगा प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आल्या आहेत. परंतु हॅरियर एक 5 सीटर एसयूव्ही आहे तर Gravitas ही 7 सीटर एसयूव्ही आहे. या कारमध्ये सीट्सची एक एक्स्ट्रा रो (रांग) असेल. सीटच्या तिसऱ्या रांगेला जागा बनवण्यासाठी टाटाने हॅरियरच्या लांबीत 63 मीलीमीटर आणि उंचीत 80 मीलीमीटरची वाढ करुन Gravitas तयार केली आहे. त्यामुळे या गाडीची एकूण लांबी 4661mm इतकी झाली आहे तर रुंदी 1894mm आहे. गाडीची उंची 1741mm इतकी आहे. या गाडीचा व्हीलबेस 2741mm इतका आहे. Gravitas ही Harrier पेक्षा थोडी मोठी असली तरी दोन्ही कार्सच्या लुक्समध्ये फार फरक नाही.

हेही वाचा

Special Story | 2021 हे वर्ष एसयूव्हींचं, अनेक आघाडीच्या कंपन्या SUV लाँचिंगचा धडाका लावणार

मोठा वेटिंग पिरियड, तरिही डिसेंबरमध्ये Thar च्या 6500 युनिट्सचं बुकिंग; या कारमध्ये काय आहे खास?

‘या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.