Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TATA : टाटा नॅनो इलेक्ट्रिकच्या स्पीडची जोरदार चर्चा, याच कारमध्ये दिसले रतन टाटा, व्हिडीओ व्हायरल

ज्या कुटुंबांकडे कार घेण्याचे फारसे बजेट नाही अशा सर्व कुटुंबांपर्यंत ही कार पोहोचवणे हे कंपनीचे ध्येय.

TATA : टाटा नॅनो इलेक्ट्रिकच्या स्पीडची जोरदार चर्चा, याच कारमध्ये दिसले रतन टाटा, व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटाImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 2:48 PM

मुंबई :   प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा एक व्हिडिओ सोशल (Social Media) मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ मुंबईतील ताज हॉटेलच्या बाहेरचा आहे. व्हिडिओमध्ये टाटा हे नॅनो इलेक्ट्रिकमध्ये (tata nano ev) दिसत आहेत. नॅनो पांढऱ्या रंगाची आहे. यामध्ये त्यांच्यासोबत शंतनू नायडू देखील दिसत आहेत. जे बहुतेक प्रसंगी त्यांच्यासोबत दिसतात. रतन टाटा अनेक वेळा टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये दिसून आले आहेत. ही कस्टम-मेड टाटा नॅनो इलेक्ट्रिक त्यांना इलेक्ट्रा ईव्ही या इलेक्ट्रिक वाहन पॉवरट्रेन सोल्यूशन्स कंपनीने भेट म्हणून दिली होती. टाटा नॅनो इलेक्ट्रिक नेहमी चर्चेत राहते.

व्हायरल व्हिडीओ पाहा

टाटा नॅनो इलेक्ट्रिकमध्ये काय खास आहे?

इलेक्ट्रा ईव्ही द्वारे सुधारित टाटा नॅनो इलेक्ट्रिकला 624cc दोन-सिलेंडर पेट्रोल इंजिनऐवजी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन मिळते. हे सुपर पॉलिमर लिथियम-आयन बॅटरीपासून बनवलेल्या 72V प्पवरट्रेन आहे. कंपनीचा दावा आहे की ते एका चार्जवर 160Km ची ड्रायव्हिंग रेंज देते. ते 10 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. 2018 मध्ये, कोईम्बतूर-आधारित कंपनी Jayem ने त्याचा इलेक्ट्रिक प्रकार Jayem Neo Electric लाँच केला होता. यातील ४०० युनिट कॅब एग्रीगेटर ओलाला देण्याची चर्चा होती.

सुरक्षेत अपयशी ठरलेली टाटा नॅनो

ही जगातील सर्वात स्वस्त हॅचबॅक कार म्हणून 2008 मध्ये लाँच झाली होती. त्यानंतर ज्या कुटुंबांकडे कार घेण्याचे फारसे बजेट नाही अशा सर्व कुटुंबांपर्यंत ही कार पोहोचवणे हे कंपनीचे ध्येय होते. मात्र, ही कार सुरक्षिततेच्या पातळीवर अपयशी ठरली. कंपनीलाही लोकांच्या सुरक्षेशी कोणत्याही प्रकारे खेळायचे नव्हते. या कारणास्तव ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शंतनू नायडू कोण आहेत?

29 वर्षीय शंतनूने तरुण वयात व्यवसाय उद्योगात नवे स्थान प्राप्त केले आहे. शंतनूने देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनाही आपल्या कल्पनांनी आपले चाहते बनवले आहे. शंतनूची मोटोपॉज नावाची कंपनी असून ही कंपनी डॉग कॉलर बनवते. हे कॉलर अंधारात चमकतात जेणेकरून कोणतेही वाहन त्यांना धडकू शकत नाही. असेही म्हटले जाते की रतन टाटा ज्या स्टार्टअप्समध्ये त्यांची वैयक्तिक गुंतवणूक करतात त्यामागे शंतनूचा मेंदू आहे.

देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?
देशमुख हत्या प्रकरणात नव्या कराडची एन्ट्री, कोण आहे सुग्रीव कराड?.
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.