तुम्हाला जर टाटाची (Tata) कार खरेदी करण्यात रस असेल तर कंपनीने तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. गेल्या महिन्यातील विक्रमी विक्रीसह टाटा मोटर्सचे नाव देशातील टॉप -3 वाहन उत्पादक कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात टाटा हॅरियरवर 65,000 रुपयांपर्यंत सूट देण्यास व्यापारी तयार आहेत. CAMO, Dark Edition, XZ + आणि XZA + वगळता इतर सर्व व्हेरिएंट्सवर 25,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. याशिवाय 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.
टाटा पोर्टफोलिओमधील सर्वात छोटी कार टाटा टियागोच्या खरेदीवर 15,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. याशिवाय 10 हजारांचा एक्सचेंज डिस्काउंटदेखील देण्यात आला आहे, म्हणजेच कारवर 25 हजारांची सूट देण्यात येणार आहे.
टाटा टिगॉर सेडानही 15,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह सादर करण्यात आली आहे. तसेच यावर 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील देण्यात आला आहे.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या टाटा सफारी, टाटा नेक्सॉन आणि टाटा अल्ट्रॉज या कारवर सवलत मिळणार नाही. कारण या तिन्ही गाड्यांना भारतीय बाजारात खूप डिमांड आहे. परंतु कंपनीने नेक्सॉन या कारवर वाहन एक्सचेंजदरम्यान 15 हजार रुपयांची सूट दिली आहे. परंतु ही ऑफर केवळ डिझेल व्हेरिएंटसाठी आहे.