Tata Punch vs Citroen C3 : स्वस्त कार, फीचर्सही अधिक हवेत, जाणून घ्या तुमच्या बजेटमधील कारविषयी….
Citroen C3 ही कार जुलैमध्ये लाँच करण्यात आली असून ती देखील कॉम्पॅक्ट SUV कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फिचर्स पाहायला मिळतात. याचविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या...
नवी दिल्ली : तुम्हाला स्वस्त कार (Car) घ्यायची आहे, त्यामध्ये अधिक फीचर्स देखील हवेत, किंमतही कमी हवी, या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणतीही कार घ्यायची असल्याची त्याची अधिक माहिती असायला हवी, ती कार आपल्या बजेटला परवडणार का, तेही माहिती असायला हवं. यासाठीच आम्ही तुम्हाला स्वस्त कारविषयी अधिक माहिती देणार आहोत. टाटा पंच (Tata Punch) vs Citroen C3 जुलै पूर्वी भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट SUV कारचे शीर्षक टाटा (TATA) पंचकडे होते. ज्याची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी होती. पण Citroen C3 ही कार जुलैमध्ये लाँच करण्यात आली असून ती देखील कॉम्पॅक्ट SUV कार आहे. या कारमध्ये अनेक चांगले फिचर्स पाहायला मिळतात. दोन्ही कार त्यांच्या वेगवेगळ्या रंगांच्या प्रकारांमुळे खूपच आकर्षक दिसतात. आता या दोनपैकी कोणती कार जास्त खरेदी करायची असा प्रश्न पडतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दोन्ही कारमधील फरक आणि वैशिष्ट्यांबद्दल सांगत आहोत. एक-एक करून दोन्ही कारची वैशिष्ट्ये जाणून घेऊया…
Tata Punch vs Citroen C3: आज आम्ही तुम्हाला Tata Punch आणि Citroen C3 कारच्या किमतीबद्दल सांगत आहोत. वास्तविक, Tata Panch ची किंमत 5.93 लाख रुपये आहे. Citroen C3 ची किंमत 5.71 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. सिट्रोएन कारमध्ये 1198 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. Citroen C3 आणि टाटा पंच या दोन्हीमध्ये पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. C3 कार एका लीटरमध्ये 19.8 kmpl मायलेज देऊ शकते असा दावा सिट्रोनने केला आहे. तर टाटा पंच 18.9 kmpl मायलेज देऊ शकतात.
Citroen C3 दोन इंजिन पर्यायांमध्ये ऑफर केली आहे. यापैकी एक 1.2 लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 81 bhp ची कमाल पॉवर आणि 115 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. याशिवाय टर्बो पेट्रोलचा आणखी एक पर्याय आहे. या इंजिन सेटअपमध्ये 1.2-लिटर मिल 109 Bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करते.
Citroen C3 ची वैशिष्ट्ये
यात 10-इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले आहे, जो इंफोटेनमेंट सिस्टमसह येतो. हे वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले कनेक्टिव्हिटीसह येते. यात चार स्पीकर ऑडिओ सिस्टम आहे. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, सीट बेल्ट रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, EBD सेन्सरसह ABS आहे.
टाटा पंचची वैशिष्ट्ये
टाटा पंच बद्दल बोलायचे तर ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आहे. यात एक आकर्षक आणि आधुनिक डिझाइन आहे. यात स्प्लिट हेडलॅम्प सेटअप आहे. फ्रंटला ग्रिल आणि स्पोर्टी बंपर देण्यात आला आहे. यामध्ये एलईडी टेललाइट्स आणि मशीन कट अॅलॉय व्हीलचा वापर करण्यात आला आहे.