TATA Safari चं डार्क एडिशन लाँच होणार, जाणून घ्या नवीन व्हेरिएंटमध्ये काय असेल खास?

टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केलेल्या TATA Safari एसयूव्हीला देशभरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अलीकडील अहवालांनुसार, टाटा कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला अल्ट्रॉझ, नेक्सॉन आणि हॅरियर सारख्या गाड्यांच्या डार्क एडिशनप्रमाणे Tata Safari चं डार्क एडिशन सादर करणार आहे.

TATA Safari चं डार्क एडिशन लाँच होणार, जाणून घ्या नवीन व्हेरिएंटमध्ये काय असेल खास?
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 3:10 PM

मुंबई ; टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केलेल्या TATA Safari एसयूव्हीला देशभरातील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अलीकडील अहवालांनुसार, टाटा कंपनी पुढील वर्षाच्या सुरुवातीला अल्ट्रॉझ, नेक्सॉन आणि हॅरियर सारख्या गाड्यांच्या डार्क एडिशनप्रमाणे Tata Safari चं डार्क एडिशन सादर करणार आहे. डार्क एडिशन सफारीला ब्लॅक-आउट फ्रंट ग्रिल आणि चारकोल ब्लॅक अलॉय व्हीलसह ऑल-ब्लॅक एक्सटीरियर मिळेल. एसयूव्हीवरील सर्व क्रोम बिट्स पियानो ब्लॅक एलिमेंट्सने बदलले जातील. सफारी डार्क एडिशनच्या केबिनला हॅरियर डार्क एडिशन प्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल. (Tata Safari Black Edition To Launch In Early 2022)

यामध्ये ब्लॅक इंटीरियर कलर स्कीम आणि सीटवर “#डार्क” ब्रँडिंगसह बेनेके कॅलिको लेदरेट अपहोल्स्ट्री समाविष्ट असेल. तसेच, व्हेंटिलेटेड सीट्सवर ट्राय-अॅरो पॅटर्न उपलब्ध असेल. दरम्यान, या एसयूव्हीमध्ये कोणतेही यांत्रिक बदल होणार नाहीत.

गोल्ड एडिशन भारतात लाँच

टाटा मोटर्सने दोन महिन्यांपूर्वी भारतात टाटा सफारीचं गोल्ड एडिशन सादर केलं होतं. या एडिशनलादेखील ग्राहकांची पसंती मिळत आहे. या एसयूव्हीच्या बाहेरील सर्व क्रोम इन्सर्ट्स आता गोल्ड हायलाइट्ससह बदलले गेले आहेत. बाजूला, दरवाजाचे हँडल गोल्डन कलरमध्ये आहेत आणि रूफ रेल्सवरही तेच हायलाइट्स दिसतात. सफारी आणि टाटाच्या मागील बॅजिंगलाही गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. मिड पॅड व्यतिरिक्त, दरवाजाच्या हँडलवर, एअर-कॉन व्हेंट्सच्या आसपास, इन्स्ट्रुमेंट पॅनेलची आउटलाइन आणि डॅशबोर्डवरील अंडरलाइनिंग गोल्ड फिनिश देण्यात आले आहे. फीचर लिस्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात 8.8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळते जी iRA अॅप बेस्ड कनेक्टेड कार टेक्नोलॉजीसह Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.

सहा व्हेरियंट्स

2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करते. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे.

अशी आहे All New Tata Safari 2021

नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते.

सेफ्टी टच

2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.

ऑल-न्यू सफारी ही 5-सीटर हॅरियरचं मोठी व्हेरियंट आहे. ही कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. तसेच गेल्या आठवड्यात टाटाने फ्लॅगऑफ सेरेमनीनंतर पहिल्या नव्या Safari चं 26 जानेवारीला आगमन होत असल्याचं जाहीर केलं होतं. या आठवड्याच्या शेवटी ही गाडी शोरूममध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच लवकरच या गाडीचं बुकिंगही सुरु होणार आहे. टाटा मोटर्सची ही नवी Safari ची इंटेरिअर थीम Oyster White रंगाची आहे. या गाडीत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आलंय. याशिवाय या गाडीचे व्हील आणि फ्रंटवर क्रोम फिनिश लूक देण्यात आलाय. टाटा मोटर्सने म्हटलं आहे, “भविष्यात नव्या Safari चं इलेक्ट्रिक व्हर्जनही येऊ शकतं. या गाडीला त्याला साजेसं डिझाईन साकारण्यात आलं आहे.

दमदार इंजिन

या कारच्या इंजिन आणि गियरबॉक्स चा विचार केल्यास या कारमध्ये 2.0 लीटर क्रायोटेक टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. याचा वापर हॅरियरमध्ये केला जावू शकतो. हे इंजिन 170 एचपीचे पॉवर जनरेट करते. याशिवाय कारमध्ये सिक्स स्पीड मॅन्यूअल आणि सिक्स स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स दिले आहेत. ही कार 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम सोबत येते.

महत्त्वाचे फीचर्स

  • LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स : टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
  • चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स : हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
  • रूफ रेल्स : 2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.
  • बॉस मोड : बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
  • टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टियरिंग व्हील : 2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
  • रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स : सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.

इतर बातम्या

ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलेल्या BS-IV वाहनांच्या रजिस्ट्रेशनला सुप्रीम कोर्टाची अटी शर्थींसह मंजुरी

2022 KTM 390 Adventure लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि बाईकची खासियत

सिंगल चार्जमध्ये 85 किमी रेंज, अवघ्या 36000 रुपयांत घरी न्या शानदार इलेक्ट्रिक स्कूटर

(Tata Safari Black Edition To Launch In Early 2022)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.