Tata ची सर्वात छोटी SUV 4 ऑगस्टला बाजारात, 5 लाखांहून कमी किंमतीत दमदार फीचर्स
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच आपली टाटा एचबीएक्स (Tata HBX) ही एसयूव्ही भारतात दाखल करू शकते.
मुंबई : भारतात SUV सेगमेंट आता खूपच लोकप्रिय झालं आहे. ह्युंदाय क्रेटा (Hyundai Creta), किया सेल्टॉस (Kia Seltos), किया सोनेट (Kia Sonet), ह्युंदाय वेन्यू (Hyundai Venue), निसान मॅग्नाईट (Nissan Magnite) या SUVs ने भारतीय मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घातला आहे. या वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, आता प्रीमियम SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळेच भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने Ignis आणि अर्बन SUV लाँच केली आहे. परंतु आता टाटा (Tata) कंपनीदेखील या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. टाटा आणि ह्युंदाय या दोन वाहन उत्पादक कंपन्या लवकरच भारतीय मार्केटमध्ये दोन नव्या SUV लाँच करणार आहेत. (Tatas mini SUV HBX Hornbill will launch on 4th august in India with under 5 lakh rupees)
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच आपली टाटा एचबीएक्स (Tata HBX) ही एसयूव्ही भारतात दाखल करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार ही कार 4 ऑगस्ट रोजी सादर केली जाऊ शकते. कंपनीने अद्याप या कारचे नाव जाहीर केले नाही. मात्र असे मानले जात आहे की, या कारला HBX Mini SUV असे नाव दिले जाऊ शकते.
हॉर्नबिल ही कंपनीची सर्वात छोटी एसयूव्ही असेल आणि यासाठी टाटाच्या फ्लॅगशिप एसयूव्ही हॅरियर आणि सफारी या 5 सीटर, सब 4 मीटर मॉडेलचे डिझाइन घेण्यात आले आहे. ही एसयूव्ही लॉन्च होण्यापूर्वीच या कारचे उत्पादन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती आणि आता ही कार डीलर्सकडे पाठवण्यासाठी तयार आहे.
Tata HBX Hornbill चं डिझाइन
या मायक्रो एसयूव्हीमध्ये कंपनीचं इम्पॅक्ट 2.0 डिझाइन उपलब्ध असेल. याचं फ्रंट डिझाईन हॅरियर प्रमाणेच असेल, जे टाटाच्या सिग्नेचर ‘ह्युमॅनिटी लाइन’ ग्रिलसह येईल. अल्ट्रॉज हॅचबॅकनंतर हॉर्नबिल कंपनीच्या लाइन अपमधील दुसरे मॉडेल आहे जे ALFA (अॅजिल लाईट फ्लेक्सिबल अॅडव्हान्स) प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे. यामुळे, उत्कृष्ट सुरक्षा मिळेल आणि ही एसयूव्ही जबरदस्त सेफ्टी रेटिंग प्राप्त करेल अशीही अपेक्षा आहे.
याव्यतिरिक्त या एसयूव्हीच्या डिझाईनमध्ये एलईडी डीआरएलसह स्प्लिट हेडलॅम्प क्लस्टर आणि लो माउंटेड सर्कुलर फॉगलॅम्प, ट्राय-एरो पॅटर्नसह एलईडी टेललॅम्प्स, रूफ माउंटेड स्पॉयलर आणि 15 इंचांचे ड्युअल टोन अॅलोय व्हील्स देण्यात आले आहेत. यासह, इंटिरियरमध्ये एक फ्लोटिंग टचस्क्रीन मिळेल जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येईल आणि यासह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. यामध्ये मल्टी फंक्शन, 3 स्पीक आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोलसह फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील मिळेल. याशिवाय यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी व एबीएससह रियर पार्किंग कॅमेरासुद्धा मिळेल.
Tata HBX Hornbill चं इंजिन
या मिनी एसयूव्हीमध्ये 1.2 लीटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन मिळेल जे 85 एचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करेल. याबरोबरच स्टँडर्ड ऑप्शन म्हणून 5 स्पीड ट्रान्समिशन मिळणार असून 5 स्पीड एएमटी ऑप्शनदेखील उपलब्ध होईल. लॉन्चनंतर Tata HBX Hornbill ही कार महिंद्रा KUV100, मारुती सुझुकी इग्निस या गाड्यांना टक्कर देईल. या एसयूव्हीची सुरूवातीची किंमत 5 लाख रुपये असेल.
इतर बातम्या
शानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात
भारतात Hyundai च्या ‘या’ SUV ची रेकॉर्डब्रेक विक्री, एका महिन्यात 11000 हून अधिक बुकिंग्स
मारुती, टाटा आणि रेनॉच्या ‘या’ तीन गाड्यांना मध्यमवर्गीय कुटुंबांची पसंती
(Tatas mini SUV HBX Hornbill will launch on 4th august in India with under 5 lakh rupees)