प्रतीक्षा संपली…ग्लोबल एनसीएपी सेफ्टी कार्सची यादी प्रसिध्द… भारतातील ‘या’ 10 कार सर्वाधिक सुरक्षित

देशातील टॉप सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्सच्या नुकतीच सेफ्टी फिचरची तपासणी करण्यात आली. ग्लोबल एनसीएपीअंतर्गत कार क्रॅश टेस्टमध्ये त्यांनी 5 व 4 स्टार रेटींग मिळवत ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

प्रतीक्षा संपली...ग्लोबल एनसीएपी सेफ्टी कार्सची यादी प्रसिध्द... भारतातील ‘या’ 10 कार सर्वाधिक सुरक्षित
महेंद्र एक्सयूव्ही 700 ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे.Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 12:29 PM

ग्राहक कारची खरेदी करताना लूक, मायलेज, इंजीन, कंफर्ट यासह सर्वात महत्वाचे म्हणजे तिचे सेफ्टी फिचर्सकडे विशेष लक्ष देत असतो. रोड अपघातांची संख्या बघता कंपन्याही नवीन कारची निर्मिती करताना ती जास्तीत जास्त सुरक्षित रहावी, यासाठी प्रयत्न करीत असतात. तुम्ही अशाच सेफ्टी कारच्या शोधात असाल तर तुमची प्रतीक्षा संपली आहे. ग्लोबल एनसीएपीकडून (Global NCAP) नुकतेच भारतातील सर्वात सुरक्षित कार्सची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्यात टोयोटा अर्बन क्रूजर ही भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार (safest cars) म्हणून नावारुपाला आली आहे. सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही (sub compact suv) कार्सचे नुकतीच सेफ्टी फिचरची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक कार्सनी 4-स्टार रेटींग मिळवले आहे. अर्बन क्रूजरला ह्युंडाई क्रूजर आणि आय-20 सारख्या अन्य भारतीय कार्ससोबत तपासणीसाठी उतरवण्यात आले होते. भारतातील सर्वाधिक 10 सेफ्टी कार्सची माहिती घेउया…

1) महेंद्रा एक्सयुव्ही 700

महेंद्र एक्सयूव्ही 700 ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार म्हणून ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. गेल्या वर्षी ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटींग देण्यात आले होते. एसयुव्ही सात एअर बॅग, इलेक्ट्रिक स्टेबिलिटी प्रोग्राम, 360 डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्यू मोनिटरींग, ड्राइवर असिस्टेंस सिस्टीम सारखे भरपूर फिचर्स या कारमध्ये आहेत. इमर्जंसी ब्रेकिंग सिस्टीम, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वार्निंग, स्मार्ट पायलट असिस्अ, हाय बीम असिस्ट आदींचाही त्यात समावेश आहे.

2) टाटा पंच

टाटाच्या एक्सयुव्ही पंचनेदेखील ग्लोबल एनसीएपीच्या चाचणीत आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतातील ही सध्याची दुसरी सर्वात सेफ कार मानली जात आहे. यात अडल्टच्या सुरक्षेसाठी 5-स्टार रेटींग व मुलांच्या सुरक्षेसाठी 4-स्टार रेटींग देण्यात आल आहे.

3) महेंद्रा एक्सयुव्ही 300

महेंद्रा एक्सयुव्ही 300 ला ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटींग देण्यात आली आहे. या कारला सुरक्षेबाबत चांगले फिचर्स असल्याबद्दल ग्लोबल एनसीएपीचा पहिला Safer Choice अवॉर्ड मिळाला होता.

4) टाटा अल्ट्रोज

टाटा या प्रीमिअर हॅचबॅक अल्ट्रोज कारला ग्लोबल एनसीएपी चाचणीत 5-स्टार रेटींग मिळाली आहे. त्याच प्रमाणे आपल्या सेगमेंटमधील सर्वाधिक सेफ्टी कारदेखील मानली जाते. ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी या कारला 3-स्टार रेटींग मिळाली आहे. अल्ट्रोज एबीएस, सेंट्रल लॉकींग सिस्टीम, ईबीडी, आईएसओफिक्स, दोन एअर बॅग आदी सेफ्टी फिचर्सचा यात समावेश होतो.

5) टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन ही भारतातील सब- कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारमधील एक कार आहे. या कारला 5-स्टार रेटींग देण्यात आले आहे. ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी या कारला 5-स्टार तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 3-स्टार रेटींग देण्यात आले आहे. टाटा नेक्सॉनला ड्युअल फ्रंट एअर बॅग देण्यात आल्या आहेत.

6) महेंद्रा थार

ऑफ रोड एसयुव्ही भारतातील सर्वात सेफ्टी कार्सच्या ग्लोबल एनसीएपीच्या यादीत समाविष्ठ होणारी महेंद्राची ही पहिली कार होती. या कारला गेल्या वर्षीच्या रेटींगमध्ये अडल्ट आणि मुलांच्या सेफ्टीबाबत 4-स्टार रेटींग देण्यात आले होते. या कारमध्ये 2 एअर बॅग, एबीएस, ईबीए, ईबीडी, हिल, असिस्ट, आईएसओफिक्स आदी सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

7) होंडा सिटी

4th जनरेशन च्या होंडा सिटी सेडन कारने एनसीएपी चाचणीत अडल्ट आणि मुलांच्या सेफ्टीसाठी 4-स्टार रेटींग मिळवले आहेत. होंडा सिटी दोन फ्रंटल एअर बॅग आणि एबीएस, ईबीडी, व्हेकल स्टेबिलिटी, हिल स्टार्ट असिस्ट आदीं फिचर्सचा यात समावेश होतो.

8) टाटा टिगोर ईव्ही

टाटाच्या इलेक्ट्रिक सेडन एनसीएपी चाचणीत सहभागी होणारी पहिली इलेक्ट्रिक कार आहे. भारतात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार म्हूणनही टिगोर ईव्हीला ओळखले जाते. अडल्ट आणि मुलांच्या सेफ्टीसाठी कारला 4-स्टार रेटींग मिळाले आहेत.

9) टोयोटा अर्बन क्रूजर

टोयोटा अर्बन क्रूजरला या यादीत नवव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. या कारणे सेफ्टी चाचणीत 4-स्टार रेटींग मिळवले आहेत. दोन फ्रंटल एअर बॅग, लॉक ब्रेकींग सिस्टीम, ईबीडी, आईएसओफिक्स, हिल असिस्ट, रिवर्स पार्किंग सेंसर आदी विविध सेफ्टी फिचर्स उपलब्ध आहेत.

10) टाटा टियागो/टिगोर

टिगोर आणि टियागोला या दोघांना अडल्ट आणि मुलांच्या सेफ्टीसाठी अनुक्रमे 4-स्टार व 3 स्टार देण्यात आले आहे. दोन्ही कार्समध्ये सिक्युरिटी डिव्हाईससाठी दोन एअर बॅग देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :  Paytm द्वारे तुमच्या जवळची Blood Bank आणि प्लाझ्माची माहिती मिळवा, कंपनीकडून E-RaktKosh फीचर सुरु

युनिक लूकसह Realme 9 Pro + चं Free Fire लिमिटेड एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.